मगर ही जगातील सर्वात खतरनाक प्राण्यांपैकी एक आहे. मगरीला ‘पाण्याचा राक्षस’ म्हणूनही ओळखले जाते. कारण पाण्याखाली त्यांचा मुकाबला करण्याची ताकद कोणत्याही इतर प्राण्यात नाही आहे, मग तो सिंह असला तरीही. पाण्याखाली, ते सिंहावरही हल्ला करू शकतात आणि त्यांना फाडून खाऊ शकतात. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील , ज्यामध्ये मगरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची शिकार करताना दिसत आहेत. आजकाल असाच एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे , जो पाहून तुमचा नक्कीच थरकाप उडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक मगर तलावातील पाणी पीत असलेल्या चित्त्याची धोकादायक शिकार करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, चित्ता नदीकाठी पाणी पीत बसला आहे. पण मगरीच्या आगमनाची त्याला किंचितही कल्पना येत नाही. मगर गुपचूप पाण्यातून बाहेर आली आणि क्षणार्धात चित्त्याला पकडून ओढत पाण्यात नेले. मगरीने चित्याला पाण्यात ओढल्यावर पळून जाण्यासाठी तो पाण्यात पाय मारत राहिला, पण मगरीने त्याला पकडून ठेवले. अशा परिस्थितीत शेवटी त्या बिचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.

( हे ही वाचा: VIRAL VIDEO: जंगलाचा राजा सिंहावर हत्तीचा गुपचूप हल्ला, जीव वाचवून पळ काढणार तोच समोर दुसरा हत्ती; यानंतर काय झाले ते तुम्हीच पाहा)

पहा मगरीने चित्ता कसा पकडला

( हे ही वाचा: झोपलेल्या सिंहणीची सिंहाने काढली छेड; मग असं काही घडलं, ज्याने जंगलाचा राजा पूरता हादरला, पहा Video)

मगरीचा हा थरकाप उडवणारा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @natureisbruta1 या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. ४५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ६८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giant crocodile attacks and hunt cheetah shocking video viral on social media gps
First published on: 21-09-2022 at 16:02 IST