amazing race to increase concentration : मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी एकाग्रता ही खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही कामात एकाग्रतेने काम केले तर त्यात यश मिळतेच. अनेकांच्या आयुष्यात अनेक आव्हानात्मक कामांत खूप अडचणी येतात. यात महत्वाची परीक्षा असो की प्रोजेक्ट असो, यात आपल्याला काम करण्याची इच्छाशक्ती असते मात्र लक्ष केंद्रित कसे करावे समजत नाही, अशावेळी एकाग्रता आवश्यकता असते. एकाग्रतेमुळे अभ्यासात तसेच समाजाच्या इतर पैलूंमध्ये यशस्वी होण्यास मदत होते. हा गुण मुलांना एक चांगला माणूस बनवण्यासाठीही मदत करतो. नुकताच सोशल मीडियावर एत व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगी लक्ष केंद्रित करण्यासाठी एक अनोखा खेळ खेळताना दिसत आहे. हा खेळ दिसायला जरी सोपा वाटत असला तरी यामुळे मुलांची एकाग्रता वाढतेय.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकाल की, एक मुलगी ४ लाकडी ठोकळ्यांच्या मदतीने विशिष्ट पद्धतीने चालताना दिसत आहे. ही पद्धत मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. तुम्हालाही या खेळातील शर्यत पहिल्यांदा पाहताना खूप सोपी वाटेल, पण जेव्हा तुम्ही नीट पाहाल तेव्हा समजेल की, हा किती अवघड खेळ आहे.
एकाग्रता वाढवण्याचा अप्रतिम उपाय
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अनेक मुलं- मुली शर्यत लावताना दिसत आहे. यावेळी मैदानात चार लाकडी ठोकळे ठेवण्यात आले आहेत. शर्यत सुरु होताच एक मुलगी दोन लाकडी ठोकळ्यांवर पाय ठेवत कमरेत वाकून बसते. नंतर मागचे दोन ठोकळे पुढे ठेवून त्यावर बसत पुढे जाते. अशाप्रकारे ती मागे ठोकळे पुढे करत त्यावर पाय ठेवत पुढे जात आहे. ती एवढ्या वेगाने हे करत असतानाही ना तिचा तोल बिघडतो ना ती चुकीच्या ठोकळा पुढे टाकतेय. तिचे संपूर्ण लक्ष त्या लाकडी ठोकळ्यांवर असते. अशाप्रकारे ती शर्यतीत पुढे जाते आणि यश मिळवते.
हा मजेशीर व्हिडीओ @TheBestFigen नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ज्याला आत्तापर्यंत २८ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, हे करण्यासाठी कौशल्याची नक्कीच गरज आहे, असे करताना माझी कंबर मोडली असती.