Girl Wearing Green Dress In Market Dance Video: सोशल मीडिया हा कमी वेळेत व टॅलेंट असूनही प्रसिद्ध व्हायचा सोपा मार्ग आहे असं अनेक टीकाकार म्हणतात. काही सुजाण इन्फ्लुएन्सर व क्रिएटर्स या टीकाकारांची मतं हाणून पाडतात पण दुर्दैवाने अन्य अनेक मंडळी टीकाकारांना खरं सिद्ध करण्याचंच काम करतात. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीचे काहीश्या उच्छृंखल पद्धतीने नाचतानाचे व्हिडीओ टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. यापूर्वी ट्रेनमध्ये, बसमध्ये, बागेत सुद्धा नाचताना या तरुणीचे व्हिडीओ चर्चेत आले होते पण आता तिचा चक्क भररस्त्यातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले आहेत. अनेकांनी तिच्या कपड्यांवर टीका केली आहे पण त्याही पेक्षा तिने अशा पद्धतीने रस्त्यात नाचून इतरांची गैरसोय केल्याने नेटकरी भडकले आहेत.
या तरुणीच्या वयाबाबत अनेकजण वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. सध्या चर्चेत असणाऱ्या व्हिडिओमध्ये हिरव्या निऑन रंगाचा ड्रेस, पांढरे शूज व उंच बांधलेले केस अशा अवतारात ती रस्त्यावर नाचताना दिसत आहे. तर यापूर्वी एकदा ट्रेनमध्ये निळ्या निऑनच्या ड्रेसमध्ये सुद्धा तिने भोजपुरी गाण्यावर नाचताना व्हिडीओ बनवला होता. दोन्ही वेळेस व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने तिला आता अधिकच उत्साह आला आहे आणि दरवेळी ती काहीतरी विचित्र प्रकार करत असते असे नेटकरी म्हणत आहेत.
Video: भररस्त्यात लोकांची गैरसोय आणि तिची रील
हे ही वाचा<< पॅलेस्टाईनचे मुस्लिम भारतीय ध्वज घेऊन पळतानाचा Video चर्चेत! कारण ऐकून व्हाल थक्क, काय आहे खरी बाजू
दरम्यान, ही तरुणी कोण याविषयी सुद्धा अनेकजण जाणून घेण्यास उत्सुक आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या नाचण्याचा अश्लीलतेचा टॅग लावला आहे. काहींनी तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत रस्त्यात आम्हाला मोठ्याने बोलायला पण लाज वाटते ही नाचते कशी असा गमतीत प्रश्न केला आहे. तर काही डान्सर मंडळींनी यावर कमेंट करून अशा लोकांची कीव येते जे चार लाईक्ससाठी नृत्याला अश्लील पद्धतीने सादर करून सर्वांचं नाव खराब करतात. यांनी लाज सोडली म्हणून आम्हालाही ट्रोल केलं जातं असे म्हटले आहे. तुम्हाला या प्रकारच्या भररस्त्यातील रीलमेकर्स बद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगा.