Google 27th Birthday Doodle : काही अडलं, काही चुकलं की, काही शोधायचं झालं की, सगळ्यात पहिला आठवतं ते गूगल (Google). राजकारण, मनोरंजन असो किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या अगदी महत्वाच्या गोष्टीही इथे अगदी सहज मिळून जातात. तर आज चांगल्या आणि वाईट प्रसंगात अगदी आपल्या मदतीला धावून येणाऱ्या गूगलचा आज २७ वा वाढदिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन आपला वाढदिवस रंगीबेरंगी गुगल डूडलसह साजरा करतो. चला तर मग या डूडलमध्ये काय खास आहे आणि या विशेष दिनी, गुगलविषयी काही खास गोष्टी सुद्धा जाणून घेऊयात…
गुगलचा २७वा वाढदिवस
गूगल डूडलसह गूगलच्या २७वा वाढदिवस साजरा करत आहे. हे डूडल गूगलच्या २७ व्या वाढदिवसाचे प्रतीक आहे. कंपनीने डूडल म्हणून त्यांचा पहिल्या लोगोची आठवण करून देत आहोत आणि आम्हाला आमची नवीन AI इनोव्हेशन झलक देखील दाखवली आहे. आज “जस्ट गुगल इट” म्हणणे ही एक सामान्य सवय बनली असली तरीही. न्यूयॉर्कमध्ये पिझ्झा शोधणे असो, लॉस एंजेलिसच्या फ्लाइटचा मागोवा घेणे असो किंवा स्पोर्ट्स स्कोअर तपासणे असो, गुगल सर्वत्र आहे’ ; असे गूगलने निवेदनात म्हंटले आहे.
पण, तुम्हाला माहिती आहे का या सर्च इंजिनचे आधीचे नाव काय होते?
असा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर त्याचे उत्तर बहुतांश जणांना माहित नसेल. पण, १९९८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गुगलचे आधीचे नाव होते बॅकरब. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या संशोधकांनी गुगलची निर्मिती केली. ४ सप्टेंबर रोजी टायटॅनिक जहाजाचे ७३ सालापूर्वीचे फोटो सापडल्यामुळे गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. शोधण्यात आलेली वेबसाईट किती महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी ते बॅक लिंक्स पद्धतीबरोबरच त्या साईटशी संबंधित इतर साईट्सचा वापर करत असत. त्यामुळे त्याचे नाव बॅकरब असे ठेवण्यात आले. बॅकरब हे जोपर्यंत कमी ब्रॅण्डविड्थ वापरत होते तोपर्यंत ते स्टॅण्डफर्डचाच सर्व्हर वापरत होते.
१९९७ मध्ये बॅकरब हे नाव तितकेसे चांगले नसल्याचे लक्षात आले. मग आहे ते नाव बदलून काय ठेवायचे यावर बऱ्याच चर्चा झाल्या आणि विचारही करण्यात आला. मग गणितातील एका संकल्पनेवरुन हे नाव ठेवण्यात आले. googol याचा अर्थ एकावर १०० शून्य असा होतो. म्हणजेच एक गोष्ट शोधल्यावर १०० गोष्टी सापडतील असे. मग याचेच पुढे Google झाले. जगभरात असलेली माहिती योग्य पद्धतीने साठवणे हा कंपनीचा सुरुवातीला मुख्य उद्देश होता. त्यानंतर कंपनीने आपल्या वेगवेगळ्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली.