scorecardresearch

Independence Day 2022: गुगलने डुडल बनवून दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, केरळच्या कलाकाराने साकारली कलाकृती

पतंगांच्या माध्यमातून भारताच्या संस्कृतीचे चित्रण या डुडलमध्ये करण्यात आले आहे

Independence Day 2022: गुगलने डुडल बनवून दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, केरळच्या कलाकाराने साकारली कलाकृती
केरळच्या कलाकाराने साकारले डुडल

देशात आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. गुगुलनेही डुडल बनवून भारताच्या स्वातंत्र्याच्या जल्लोषात सहभाग नोंदवला आहे. नागरिक आकाशात उंच पतंगी उडवतानाचे हे डुडल गुगुलने बनवले आहे. आकाशातील उंच उडणाऱ्या पतंगी भारताने गाठलेल्या उंचीचे प्रतिक असल्याचे हे डुडल आहे. केरळचे कलाकार निथी यांनी ही कलाकृती साकारली आहे.

पतंगांच्या माध्यमातून भारताच्या संस्कृतीचे चित्रण या डुडलमध्ये करण्यात आले आहे. सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन पतंग बनवत असल्याचे या कलाकृतीमध्ये दाखवण्यात आले आहे. भारतातील सर्व सण-उत्सव सर्वधर्मीय एकत्र येत साजरे करतात हे यातून अधोरेखित करण्याचा कलाकाराचा प्रयत्न आहे.

Independence Day: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा भारतासाठी खास संदेश; महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले, “अमेरिकेतील भारतीयांनी…”

भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून देशात अनेक ठिकाणी पतंग उडवण्याची परंपरा आहे. स्वातंत्र्य लढ्यात भारतीय क्रांतीकारकांनी ब्रिटिश राजवटीविरोधात निषेधाचा संदेश असलेल्या पतंगी उडवल्या होत्या. तेव्हापासून स्वातंत्र्यदिनी स्पर्धात्मक आणि मनोरंजक पतंग उडवण्याची परंपरा आजतागायत कायम आहे.

विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

जवळपास दोनशे वर्ष ब्रिटिशांच्या दडपशाहीला आणि वसाहतवादाला तोंड दिल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांचे अथक परिश्रम आणि त्यागानंतर स्वतंत्र भारताचा जन्म झाला होता. या शुरविरांच्या बलिदानाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशात केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव साजरा’ करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला देखील देशात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Independence Day 2022 Photos: मोदींचा खास पेहराव, लाल किल्ल्यावरील सेलिब्रेशन अन् बरंच काही….

दिल्लीतील लाल किल्यावर आज सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी पहिल्यांदाच स्वदेशी तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केले. देशात स्वातंत्र्यदिनी शाळा, शासकीय कार्यालये, आस्थापनांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. झेंडावंदन करून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शुरविरांना आदरांजली वाहिली जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Google made doodle on independence day of india 2022 rvs

ताज्या बातम्या