Viral Video : लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी डान्सचे तर कधी नवरदेव आणि नवरीच्या हटक्या क्षणांचे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरी नाही तर नवरदेव चक्क उखाणा घेताना दिसत आहे. नवरदेवाचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. उखाण्याच्या माध्यमातून त्याने भन्नाट शैलीने त्याची लव्हस्टोरी सांगितली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला नुकतेच लग्न झालेले नवरदेव आणि नवरी दिसेल आणि त्यांच्या आजुबाजूला असणारे नातेवाईक आणि मित्रमंडळी दिसतील जे नवरदेवाला उखाणा सांगण्यासाठी आग्रह करत आहे. शेवटी नवरदेव या सर्वांचा मान राखून उखाणा घेतो.
हेही वाचा : नवरा असावा तर असा! नवरदेव पडला चक्क नवरीच्या पाया, व्हिडीओ एकदा पाहाच
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव उखाणा घेताना म्हणाला,
“लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा पाहिलं..दोन वर्षांनी इंस्टाग्रामवर हेरलं..
मेसेज करु की नको, अशी वाटत होती भीती..
मग विचार केला, वाट बघू तरी किती..
मेसेज केला अन् रिप्लाय मला आला..
चव्हाणांच्या मुलीवर इश्क मला झाला..
निश्चय केला हीच आपली लाईफ,
म्हणून श्रावणीचं नाव घेतो अॅज माय वाईफ”
या उखाण्याद्वारे नवरदेवाने चक्क आपली लव्हस्टोरी सांगितली आहे. ते पहिल्यांदा कसे आणि कुठे भेटले, त्यानंतर त्यांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली, हे सर्व नवरदेवाने हटक्या पद्धतीने सांगितले.
हेही वाचा : Optical Illusion : या फोटोमध्ये लपलेले आहेत दोन पुरुष, एकदा नीट क्लिक करून पाहा
shootby_harshal या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने लिहिले, ” एकदम भारी उखाणा” तर एका युजरने लिहिले,”एक नंबर भाऊ” आणखी एका युजरने लिहिले, “तुमची जोडी खूप भारी दिसत आहे” याशिवाय अनेक युजर्सनी व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहे.