आजची तरुणाई ही सोशल मिडियाच्या जगात इतकी गुरफटलेली आहे की त्याबाहेरच जग त्यांना दिसत नाही. आजच्या तरुणाईचे विश्व म्हणजे हनी सिंग आणि बादशाहच्या गाण्यावर वेड्यासारखा डान्स करायचा, नेहा कक्कर आणि टोनी कक्करची अर्थहीन गाणी गुणगुणत बसायचे. ही अशी प्रतिमा आजच्या तरुणाईची आहे. हे सत्य असले तरी अजूनही असे तरुण आहेत ज्यांना अध्यात्माची ओढ आहे. ज्यांना संस्कृत श्लोक, आरती यांचे वेड आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हनुमान चालिसाचे पठण करण्यात तरुणाई गुंग

तुम्ही आतापर्यंत तरुणाईंचे रॉक कॉन्सर्टमध्ये गातानाचे व्हिडिओ पाहिले असतील, किंवा रस्त्यावर एखाद्या गायकासह अरजित सिंगच्या गाण्यावर गुणगुणारे तरुण असे व्हिडिओ पाहिले असतील पण हा व्हिडिओ पूर्ण वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण कॅफेच्या बाहेर बसलेले दिसत आहे जे चक्क हनुमान चालिसाचे पठण करत आहे. होय! तुम्ही बरोबर ऐकत आहात. हे तरुण कोणतेही बॉलिवूडचे गाणे नव्हे तर हनुमान चालिसा म्हणत आहे. हा व्हिडिओ हरियाणामधील गुरुग्राम येथील आहे.

दर गुरुवारी तरुण करतात हनुमान चालिसाचे पठण

हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हनुमान चालिसा गाणाऱ्या तरुणांसोबत आसपासचे लोक देखील त्यांना साथ देत आहे. हे तरुण दर मंगळवारी एकत्र येऊन हनुमान चालिसाचे पठण करतात अशी माहिती समोर येत आहे.

नवऱ्याचा नादच खुळा! बीडमध्ये बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी

तरुणांचे होते कौतुक
या व्हिडिओला लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. काही लोक या तरुणांचे कौतुक करत आहेत तर काही लोक त्यांना रोजगार नाही म्हणून असे व्हिडिओ करत आहेत अशी टिका करत आहे.

‘हे’ कोडं सोडवा २ कोटी जिंका? जगभरातील वैज्ञानिकांनी दिली ऑफर, तुम्हाला जमेल का?

एकाने या व्हिडिओवर, अप्रतिम.!! सकारात्मक व्हिडिओ. अशी कमेंट केली आहे तर दुसऱ्याने बेरोजगारीचा कळस अशी टिका करणारी कमेंट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला?