scorecardresearch

‘हे’ कोडं सोडवा २ कोटी जिंका? जगभरातील वैज्ञानिकांनी दिली ऑफर, तुम्हाला जमेल का?

Trending Puzzle: या कोड्याच्या उत्तरासाठी वैज्ञानिकांनी चक्क २५०,००० डॉलर्सचे बक्षीस सुद्धा ठेवलेले आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम २ कोटींहून अधिक आहे.

2 crore Prize For Solving Trending Puzzle Online Said To Be 2000 years old 99 percent people failed try
'हे' कोडं सोडवा २ कोटी जिंका! जगभरातील वैज्ञानिकांनी दिली ऑफर (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Trending Puzzle: कोडी सोडवणं अनेकांना आवडतं अर्थात प्रत्येकाच्या बुद्धीला कोडी सोडवता येतीलच असे नाही. एखादं कोडं तर कधी कधी इतकं कठीण असतं की जगातील भल्या भल्या मेंदूंना सुद्धा यावर उत्तर काही सापडत नाही. असंच एक कोडं सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या कोड्याच्या उत्तरासाठी वैज्ञानिकांनी चक्क २५०,००० डॉलर्सचे बक्षीस सुद्धा ठेवलेले आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम २ कोटींहून अधिक आहे. आता हे कोडं नेमकं आहे तरी काय आणि त्यात नेमकं काय कठीण आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? चला तर पाहुया हा प्रकार नेमका आहे तरी काय?

प्राप्त महितीनुसार, माउंट विसुवियस येथे झालेल्या स्फोटानंतर काही अर्धवट जळून राख झालेल्या पत्रकावरील २००० वर्षांपूर्वीचा मजकूर एक मोठं कोडं बनला आहे. हा मजकूर वाचून त्याच्या अर्थाचा उलगडा करण्यासाठी वैज्ञानिक कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत. ७९ व्या शतकात ज्वालामुखीच्या उद्रेकाने पॉम्पेईचा पूर्ण विनाश झाला होता. इथे असलेल्या हरकुलेनियम पुस्तकालयाचे खूप नुकसान झाले होते ज्यामुळे शेकडो पुस्तके- ग्रंथ जळून राख झाले होते. १७५२ मध्ये नेपल्सच्या खाडीवर या ग्रंथांचे काही अंश आढळून आले होते. यातील एकूणच मजकूर रहस्यमयी आहे.

हे ही वाचा<< मुकेश अंबानींच्या शेफचा पगार वाचून व्हाल थक्क! आमदारांपेक्षा अधिक सुविधा आणि काम फक्त…

सद्य माहितीनुसार,आता हा मजकूर वाचून त्याचा अर्थ शोधण्यासाठी जागतिक स्तरावर एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून या ग्रंथातील काही चिन्हे ठळक ओळखता आली आहेत पण त्यांचा वाचून अर्थ लावण्यासाठी एखाद्या हुशार मेंदूची गरज आहे. हे काम यशस्वीरित्या करणाऱ्या व्यक्तीस २५०,००० डॉलर्सचे बक्षीस देण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी वैज्ञानिक इतर अभ्यासकांना पूर्ण तांत्रिक पाठिंबा देत आहेत यामुळे लिखित मजकुर ६० ते ८० % स्पष्टपणे पाहता येत असल्याचे समजतेय.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 15:32 IST

संबंधित बातम्या