दररोज सोशल मीडियावर विचित्र व्हिडिओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर सध्या अशीच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक रिक्षा रस्त्यावरून सुसुाट वेगाने धावतेय पण त्यात कोणी चालक नाही. व्हिडिओमध्ये कोणीही रिक्षा चालवताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे आणि इंटरनेटवर काही लोक या रिक्षाला ‘हॉन्टेड ऑटो’ (झपाटलेली रिक्षा) म्हणत आहे, तसेच ड्रायव्हरशिवाय रिक्षा कशी काय धावते हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.

delhi_se_sky या इंस्टाग्राम हँडलने शेअर केलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे, “हॉन्टेड ऑटो.” पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, अनेक वापरकर्ते व्हिडिओबद्दल त्यांचे मत मांडण्यासाठी सामील झाले आहेत. काहींनी टेस्ला कारचा संदर्भ देत रिक्षाला “टेस्ला ऑटो” देखील म्हटले आहे, ज्यामध्ये AI तंत्रज्ञानामुळे चालकाशिवाय या कार रस्त्यावरून धावू शकतात.

या कथित व्हिडिओमध्ये, रस्त्यावर एक रिक्षा सुसाट वेगाने धावताना दिसत आहे. परंतु असे दिसते की, रिक्षामध्ये कोणताही चालक दिसत नाही. व्हिडिओ पाहून काही वापरकर्त्यांनी असा अंदाज व्यक्त केला की, रिक्षामध्ये मागच्या सीटवर एक व्यक्ती लपून बसली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निशहेअरच्या संस्थापक आणि व्यावसायिक जगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व पारुल गुलाटी यांनी देखील पोस्टवर कमेंट केली. त्यांनी लिहिले, “(ती रिक्षा दुसऱ्या एखाद्या कारला समोरून बांधली असेल., जे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले नही.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “टारझन द वंडर ऑटो असे म्हटले आहे.” आणखी एका वापरकर्त्याने विनोदीपणे कमेंट केली, “ही रिक्षा पाहिल्यापासून एलोन मस्क खरोखर शांत आहे.” एका वापरकर्त्याने अंदाज लावला, “त्यांनी व्हिडीओमध्ये रिक्षाच्या पुढे असलेली गाडी देखील दाखवली पाहिजे ज्याला दोरी बांधून रिक्षाला ओढले जात आहे.”