मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. वृद्ध व्यक्तीचा कुत्र्यांबरोबरचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम वापरकर्त्या जेनिफर जॉन्सनने व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती दिसत आहे ज्याचे बुट पॉलिशचे दुकान आहे. त्याच्याजवळ दोन भटके कुत्रे बसलेले दिसत आहे. ती वृद्ध त्या कुत्र्यांना प्रेमाने कुरवाळताना दिसत आहे. जे पाहून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल.

व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसे हे स्पष्ट होते की, ती वृद्ध व्यक्ती या भटक्या कुत्र्यांना त्याच्या स्वत:च्या मुलांप्रमाणे वागवतो आहे. त्यांच्याबरोबर खेळत आहे त्यांना प्रेमाने ओरडतो आहे. मायेने कुरवळतो आहे आणि त्यांना थोपटत आहे. कुत्र्याला शांतपणे झोपायला जागा मिळावी आसपासचे सामान हटवत आहे. कुत्राही अगदी लाडत येत त्याच्याबरोबर खेळत आहे. कुत्र्यांना त्या वृद्ध व्यक्तीची मायेची ऊब हवी आहे. त्यामुळे तो त्याच्याजवळ जाऊन झोपला आहे. दुसरा कुत्रा तिथेच शेजारी फुटपाथवर झोपलेला दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला भरून येईल कारण आजच्या काळात जिथे अशी माणूसकी, प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळत नाही. व्हिडीओ दर्शवतो की वृद्ध व्यक्तीच्या मनात किती करुणा आहे. प्राण्यांसाठी किती प्रेम आहे. वृद्धाच्या या कृतीचे नेटकरी कौतूक करत आहे. सोशल मीडियावर अनेक कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण हा व्हिडीओ तुम्हाला प्रेम, दया म्हणजे काय हे शिकवतो आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – व्यक्तीने वाढदिवशी केकऐवजी कापली पपई, पण का? नेटकऱ्यांना पडला प्रश्न, व्हिडीओ तुफान व्हायरल

येथे व्हिडिओ पहा:

पोस्ट झाल्यापासून १.१ दशलक्षाहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला आहे. एकाने लिहिले की” हा माणूस या जगातल्या सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे! दुसरा म्हणाला, “तो किती श्रीमंत आहे – त्याच्याकडे किती प्रेम आहे” तिसरा म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेवा काका आपल्या सर्वांपेक्षा श्रीमंत आहेत.”

हेही वाचा – मित्राला झोका देता देता घसरून पडला व्यक्ती, थेट दरीत…. थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा नकारात्मकतेने भरलेल्या जगात, वृद्ध व्यक्तीची माणुसकी दर्शवणारी कृती सर्वांनी प्रेरणा देऊन जाते.