Viral video: वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात; ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात; पण आपल्या भावना ते कोणाशीही शेअर करीत नाहीत. मुलं वडिलांपेक्षा आईच्या अधिक जवळ असतात. वडिलांप्रति आदरयुक्त भीती पाहायला मिळते. मात्र, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे कित्येक मुलांचंही एक स्वप्न असतं. अशाच एका तरुणानं ज्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य मुलांच्या भविष्यासाठी खर्च केलं अशा वडिलांना स्मार्ट फोन गिफ्ट केला.

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा बाप-लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये या मुलानं आपल्या शेतकरी वडिलांना शेतात जाऊन मोबाईल गिफ्ट केला आहे. यावेळी वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे.

“आजपर्यंत माझे सर्व लाड वडिलांनी पुरवले. आज मी वडिलांना मोबाईल घेऊन दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातो.” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: धोनीनं पुन्हा जिंकलं मन; स्वत:च्या टी-शर्टने पुसली चाहत्याच्या बाईकवरील धूळ

हा व्हिडीओ पाहून नेटीकरीही भावूक झाले आहेत तर अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. बापनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत.

Story img Loader