Horrfic Accident Video : वाहनचालकांनी कितीही सावधगिरी बाळगून वाहन चालवले तरी अपघाताच्या घटना घडतातच. अनेकदा दुसऱ्या चालकाच्या चुकीमुळे हे अपघात घडतात. ज्याचा नाहक त्रास अनेकदा चूक नसणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागतो. काहीवेळा या अपघातात चालकांसह प्रवासी गंभीररित्या जखमी होतात किंवा काहींना जीवदेखील गमवावा लागतो. सध्या अशाच एका थरारक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कार दुसऱ्या कारला जोरदार धडक देते, यानंतर ती हवेत उडते आणि पुढच्या क्षणी असे काही घडते की पाहून तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक वेगाने येणाऱ्या एसयूव्ही कारवरचे चालकाचे नियंत्रण सुटते आणि ती कार रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या कारला जोरात धडकते. ही धडक इतकी भीषण होती की, दुसरी कार थेट रस्ता सोडून एका बाजूला उडते. यावेळी एसयूव्ही कार एका बाजूने पलटी होत तशीच रस्त्यावर काही अंतर घसपटत वेगाने पुढे जाते. कार घसपट पुढे जात असताना रस्त्यावर आगीच्या ठिणग्या उडत होत्या. यानंतर पुढच्या क्षणी पलटी झालेली कार वेगात असतानाच अचानक सरळ होते आणि थांबते. एसयूव्ही कारमधील चालकाचे नशीब बलवत्तर म्हणून की काय, इतक्या भयानक अपघातानंतरही त्याचा जीव वाचला.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुसऱ्या कारला धडकल्यानंतर एसयूव्ही पलटी होत काही अंतर तशीच घसपटत जाते, नंतर अचानक सरळ होत थांबते, तेव्हा त्या कारमध्ये बसलेला ड्रायव्हर दार उघडून बाहेर येतो. यानंतर तो स्वतः आणि कार सुरक्षित आहे असे बघतो आणि पुन्हा त्या अपघातग्रस्त कारमध्ये बसून निघून जातो.

या अतिशय भीषण अपघाताचा व्हिडीओ रस्त्यावरील तिसऱ्या एका कारमधील चालकाने त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा भीषण अपघात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @ManojSh28986262 नावाच्या एका एक्स युजरने सोशल साइटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्य आणि दिलासा दोन्ही व्यक्त करत आहेत. अनेक युजर्सनी कमेंटमध्ये लिहिले की, “हे पाहून माझ्या अंगावर काटा आला, पण ड्रायव्हरला सुरक्षित पाहून माझे मन शांत झाले.” दुसऱ्याने लिहिले की, “जाको राखे साइयां, मार साके ना कोई.”