Railway accident video : रेल्वे अपघातांच्या बातम्या अनेकदा समोर येतात. कधी रेल्वे अपघात होतो; तर कधी रेल्वेने प्रवास करताना एखाद्या व्यक्तीसोबत अपघात होतो. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात; जे पाहून कोणीही घाबरून जाईल. काही वेळा हे अपघात स्वत:च्या चुकीमुळे होतात; तर कधी दुसऱ्याच्या. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये टवाळ तरुणाने एका तरुणाला कॉलरला धरून इतक्या निर्दयीपणे ओढले की, तो चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यामधील जागेमध्ये खाली पडता-पडता वाचला. भोपाळमधला हा संतापजनक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

टवाळखोराच्या चुकीमुळे एक तरुण थेट ट्रेनखाली पडता पडता वाचलाय. व्हिडीओमधील अंगावर काटा आणणारा हा धक्कादायक प्रकार गुरुवारी भोपाळ रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना पाहायला मिळाला. चालत्या ट्रेनमध्ये एका बदमाशाने एका तरुणाला प्लॅटफॉर्मच्या काठावर ओढत नेले. त्यानंतर त्याने पीडित तरुणाला कॉलरला धरून इतक्या निर्दयीपणे ओढले की, तो चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेमध्ये खाली पडता पडता वाचला. त्यानंतर काही वेळानंतर टवाळखोराने त्याला सोडून दिले. हा सर्व गैरप्रकार रेल्वेस्थानकावरील प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. भोपाळ रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘भोपाळ हायलाइट्स’ या इन्स्टाग्राम खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनच्या आत एक बदमाश एका तरुणाची कॉलर पकडून, त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने ट्रेनखाली ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनच्या आत एक बदमाश तरुणाची कॉलर पकडून त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने ट्रेनखाली ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. रेल्वेस्थानकावरील लोक हल्लेखोरावर ओरडताना दिसतात. त्यानंतर त्या मवाल्याने पीडित तरुणाची कॉलर सोडली आणि तरुण पडला. पोलीस अधिकारी या गंभीर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘जेव्हा सगळं संपलं असं वाटतं तेव्हाच देव…’ हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेमधून लोक अनेकदा जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसतात. त्यात असे गुंडगिरीचे दृश्य लोकल ट्रेनमध्ये सर्रास पाहायला मिळत आहे. केवळ लोकल ट्रेनमध्येच नाही, तर सामान्य पॅसेंजर आणि इतर एक्स्प्रेस गाड्यांमध्येही असे गैरप्रकार दिसून आले आहेत.