Soan Papdi Making Video: दिवाळीदरम्यान सगळ्यांच्या घरोघरी वाटली जाणारी सर्वात फेमस मिठाई म्हणजे सोनपापडी. आता ही सोनपापडी नेमकी तयार कशी होते हे तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेलच. पण, हा व्हिडीओ पाहून तुम्ही यावर्षी सोनपापडी खाण्यास किती इच्छुक असाल हे आता तुम्हीच तुमचं ठरवा. सध्या सोशल मीडियावर सोनपापडी बनवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात काही लोक मोठ्या मेहनतीने हा पदार्थ बनवताना दिसतायत. पण, हा पदार्थ तयार करताना स्वच्छता कुठेय असा नेटिझन्सना प्रश्न पडला आहे.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सोनपापडीला लागणारं पीठ फॉईल पेपरवर घेऊन मग ते एका मोठ्या कढईत घेऊन काही लोक ते मिक्स करताना दिसतायत. सोनपापडीसाठी लागणारं साहित्य गरम केलं जातं व त्यानंतर एक माणूस एका इमारतीच्या भिंतीवर चिकटवून ते गोल गोल फिरवताना दिसतोय. हे करून झाल्यानंतर चार ते पाच जण ग्लोज न घालता हाताने ती सोनपापडी चांगली सुटसुटीत करून मळताना दिसतायत. यानंतर ती सोनपापडी एका भांड्यात ठेवून त्यावर एक झाकण ठेवून दोघं जण त्यावर उभं राहतात आणि सोनपापडी आकारात येण्यासाठी त्यावरून चालतात.

हा व्हायरल व्हिडीओ @manuguptafitness या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ५.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… माणूस नाही हैवान! श्वानाच्या शेपटीला बांधला फटाका अन्…, VIDEO चा शेवट पाहून व्हाल निशब्द

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच सगळ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मी सोनपापडीच खात होतो आणि अचानक ही रील समोर आली.” तर दुसऱ्याने मला नाही वाटत की ब्रॅंडेड सोनपापडी अशी बनत असेल, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “कालच मला सोनपापडी गिफ्ट म्हणून मिळालं आहे.” तर “भारतात स्वच्छता बेकायदा आहे” अशी कमेंट एकाने केली.

हेही वाचा… जर आई नसती तर…, मुलाचा प्रताप पडला भारी, बेडमध्ये लपला अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर हा व्हिडीओ पाहून जेवढ्या लोकांना हा किळसवाणा प्रकार आवडला नाही तितक्याच लोकांनी याला समर्थनही दिलं आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “यात काय चुकीचं आहे, वाईन तर अनवाणी पायाने बनवली जाते. निदान इथे ते थेट अन्नावर तरी पाय ठेवत नाही आहेत.” एक जण म्हणाला, “मग काय मशीनमध्ये बनवणार”, तर “अजून कशाप्रकारे बनतं मग? यात एवढं थक्क होण्यासारखं काय आहे”, अशी कमेंट एका युजरने केली. “ही सोनपापडी बनवायला इतकी मेहनत लागते ते माहीत नव्हतं, मला तर हे ठीक वाटलं. मी सोनपापडी कायम आवडीने खात राहीन.” अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.