Elephant Hugged the Couple Videos Viral : हत्ती हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे.हत्ती जितके हुशार आहे तितकेच भावनिक असतात. हत्तीला त्रास दिला तर त्याला राग येतो, प्रेम केले तो प्रेम व्यक्त करतो. सोशल मीडियावर हत्तींचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच एका संतप्त हत्तीच्या कळपाचा वाहनांवर हल्ला करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आईच्या कुशीत निजलेल्या हत्तीच्या पिल्लाचा गोंडस व्हिडिओ चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वी हत्तीचे पिल्लू माणसाप्रमाणे खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करताना दिसले होत. एवढंच नाही तर त्याने केअर टेकरला प्रेमाने मिठी देखील मारली होती. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो तुम्हाला हसवेल.
जोडप्याला मिठी मारून दिलं प्रेमाचं उत्तर (Elephant Hugged the Couple Lovingly)
आता व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये, हत्तीचे पिल्लू पार्कमध्ये बसलेल्या जोडप्याच्या मागे लपून बसताना दिसत आहे. जसे त्याच्याकडे पाहण्यासाठी मागे वळतात तसे ते हत्तीचे पिल्लू आपली सोंड त्यांच्याभोवती गुंडाळतो. त्यानंतर, हत्ती आपले पुढचे दोन्ही पाय त्या माणसाच्या खांद्यावर ठेवतो आणि त्याला एक घट्ट मिठी मारतो
पुरुष आणि महिला दोघेही हसताना ऐकू येतात कारण हत्तीचे पिल्लू न घाबरता बिनधास्तपणे निरागसपणे त्यांना मिठी मारत राहतो. हत्तीचे पिल्लू जरी लहान असले तरी त्याचे वजन खूप जास्त असते. हत्तीला त्याच्या वजनामुळे त्या माणसाला झेपत नाही. तो कसा तरी हत्तीच्या पिल्लाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
“हत्तींचे पिल्लाला ही माणसे खूप गोंडस वाटतात आणि ते आपल्याला मिठी मारत आहे,” असे व्हिडिओचे कॅप्शन होते.
शेवटच्या अपडेटपर्यंत, व्हिडिओला दहा लाखांहून अधिक व्ह्यूज आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या होत्या, कारण हत्तीच्या पिल्लाचा गोंडसपणा पाहून नेटकरीही त्याच्या प्रेमात पडले आहे.
“हे इतके गोंडस आहे की हत्तीच्या पिल्ला ते किती मोठे आहे हे कळत नाही,” एका वापरकर्त्याने म्हटले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले: “हत्तींच्या पिल्लांना ते किती महाकाय आहेत हे कळत असेल का?
तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली: “ते महाकाय शरीरातील हत्तीचे पिल्लू अगदी लहान मुलांसारखे आहेत. त्या सोंडेने मारलेली मिठीच सर्वकाही आहे.”
चौथ्या वापरकर्त्याने म्हटले: “जेव्हा मला आजचा दिवस भयानक वाटतो होता तेव्हा हा व्हिडिओ समोर आला आणि माझ्या मनाला बरे वाटले.”
काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर आणखी एक व्हायरल पोस्टमध्ये एका हत्तीला त्याच्या केअर टेकरबरोबर आंघोळीचा आनंद घेताना दिसत होता जेव्हा त्याला एक अनपेक्षित लहान पाहुणा, एक लहान बेडूक दिसला. आकाराने तुलनेने मोठा असूनही हत्तीचे पिल्लूने प्रचंड संयम दाखवला आणि हळूवारपणे त्या बेडकापासून वाचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. हत्तीच्या या गोंडस करातमी नेहमीच नेटकऱ्यांचे मन जिंकतात.