SBI Clerk Final Result Declared 2025 : भारतीय स्टेट बँकेने घेतलेल्या क्लर्क (Clerk) पदाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने काल ११ जून २०२५ रोजी निकाल जाहीर केला आहे. तुम्ही ज्युनियर असोसिएटच्या अंतिम परीक्षेला बसलेले उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर निकाल पाहू शकतात. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी तात्पुरती निवडले जाते. निकाल तपासण्यासाठी, उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकतात…
एसबीआय क्लार्क अंतिम निकाल २०२५ तपासण्यासाठी थेट लिंक
https://sbi.co.in/documents/77530/52947104/Junior+Associates-mains-2024-RESULT-15+FORMAT.pdf/2be30817-a971-8bca-74ff-3f1274a37079?t=1749637240610
कसा तपासायचा एसबीआय क्लर्कचा अंतिम निकाल २०२५?
१. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
२. होम पेजवर उपलब्ध असलेल्या करिअर लिंकवर क्लिक करा.
३. एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना एसबीआय क्लर्क अंतिम निकाल २०२५ लिंकवर क्लिक करावे लागेल.
४. एक पीडीएफ फाइल उघडेल जिथे उमेदवार माहिती तपासू शकतात .
५. पेज डाउनलोड करा आणि भविष्यासाठी त्याची हार्ड कॉपी सुद्धा जवळ ठेवा.
प्राथमिक परीक्षेत (टप्पा-१) मिळालेले गुण निवडीसाठी जोडले जाणार नाहीत. अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी केवळ मुख्य परीक्षेत (टप्पा-२) मिळालेले एकूण गुण विचारात घेतले जातील. उमेदवाराची चाचणी (मुख्य परीक्षेत) कामगिरीच्या आधारे तात्पुरती निवड केली जाईल.
एसबीआय क्लार्क मुख्य परीक्षा २०२५ ही १० आणि १२ एप्रिल २०२५ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेत १९० प्रश्न होते, ज्यांचे जास्तीत जास्त गुण २०० होते. सामान्य /आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, परिमाणात्मक अभियोग्यता, तर्क क्षमता आणि संगणक अभियोग्यता या विषयांवरून प्रश्न विचारण्यात आले होते.
या भरती मोहिमेद्वारे एसबीआय देशभरातील १३ हजार ७३५ ज्युनियर असोसिएट रिक्त पदे भरणार आहे. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.