Viral video: आजकाल सोशल मीडियावर ‘फ्यूजन डिश’ हा एक नवीन फूड ट्रेंड बनला आहे. लोक रोज नवनवीन रेसिपी ट्राय करत आहेत, त्या सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. एखादा पदार्थ आवडतो म्हणजे त्याची चव आवडते आणि ती दुसऱ्या कोणत्या पदार्थासोबत अधिक चविष्ट लागेल याचा विचार होतो. जगभर जे फ्यूजन फूड मिळतेय त्यामागे हाच विचार मुख्य असतो. त्यातून अनेक चवीचे संगम घडलेत. मात्र, काही लोक खूपच विरुद्ध पदार्थ एकत्र करून खातात.

आपण बोंबिल, पापलेट, बांगडा, कोलंबी असं नॉनव्हेज तर खातच आलो आहोत. पण त्याऐवजी तुम्हाला कुणी मुंग्या किंवा मुंग्याचा सरबत दिला तर? किळस येते ना. असंच एक सरबत सध्या व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काळ्या मुंग्या वापरून हे खास सरबत तयार केलं जातं. पण हे सरबत कुठल्याही आफ्रिकन देशात नव्हे तर चक्क आपल्या मुंबईत विकलं जातेय. आणि मुंबईकर मोठ्या आवडीनं ते पितायेत.

या सरबताला कॉकटेल विथ ब्लॅक अँट असं म्हणतात. सर्वात आधी हव्या त्या फ्लेव्हरचं कॉकटेल तयार केलं जातं. मग त्यावर भाजलेल्या काळ्या मुंग्या टाकल्या जातात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीनं हे उत्साहाच्या भरात, वेगळं काही ट्राय करण्याच्या हेतून केलं असावं. मात्र, बघताना ते फारच विचित्र दिसत आहे. ही अनोखी रेसिपी आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केलंय. तसेच हा सरबत लोकांच्या पसंतीस उतरल्याचंही व्हिडीओमध्ये सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भररात्री तरुणीचा सायकलवर धोकादायक स्टंट; शेवटी झालं झालं ‘मोये-मोये’ VIDEO होतोय तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हालाही संताप आला असेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही या तरुणाला ट्रोल करत आहेत. व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत अशा लोकांचं काय करायचं अशीही प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. हा व्हिडीओ @mr.bartrender या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्हूज आणि लाईक्स मिळत आहेत. यावर एका युजरने लिहिले की, ‘हे बघायचे बाकी होते.’