देशभरात नवरात्रीचा उत्सव धुमधडक्यात साजरा केला जात आहे. या उत्सवानिमित्त देशभरातील रस्त्यांपासून गल्लीमध्ये लाईटिंग केली आहे. चौकाचोकात मनोरंजक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. एकीकडे लोक उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करत आहे आणि दुसरीकडे अनेकांची गैरसोय होत आहे. मुंबईमध्ये नवरात्री उत्सवा दरम्यान रस्त्यावर मोठी कोंडी झाल्याचे दिसते. परिस्थिती इतकी वाईट होती की, लोकांना चक्क रिक्षाने जाण्यासाठी तासन तास रांगेत थांबावे लागले. रिक्षासाठी भली मोठी रांग लागल्याचे दिसते आहे.

लोकल ट्रेनमधील परिस्थिती काय असते हे तुम्हाला माहितच आहे पण तुम्हाला हे ऐकूण विश्वास बसणार नाही की, लोकांना रिक्षासाठी सुद्धा मोठ्या रांगेत थांबून वाट पाहावी लागत आहे. सध्या रेडिट्टवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असे दिसते आहे की, रिक्षाची वाट पाहणाऱ्या लोंकांची भल्ली मोठी रांग लागली आहे. व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे. व्हिडीओमध्ये रहदारीच्यावेळी लोक रिक्षाने प्रवास करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसते.

हेही वाचा: शेवटी वडिलांची काळजी लेकीलाच! उपाशी पोटी काम करणाऱ्या बाबांसाठी ढसा ढसा रडली चिमुकली; पाहा ह्रदयस्पर्शी Video

DAY 1: Thane station (Sprite of Mumbai is contagious)
byu/HideousHatter inthane

हेही वाचा – फक्त दोन शिट्टी द्या अन् कुकरमध्ये कढवा तूप; पाहा तूप बनवण्याची नवी पद्धत, Viral Video

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनाही प्रश्न पडला आहे की, एवढी मोठी लांब रांगेत थांबण्याऐवजी लोक ओला किंवा उबेर सारख्या ऑनलाईन कॅब सुविधेचा वापर का नाही केला? कारण शहरात सर्वत्र रहदारीची वेळ असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे कॅब मिळणे फार अवघड झाले होते . जर एखाद्याला कॅब मिळाली तर ड्रायव्हर राईट रद्द करत होते त्यामुळे लोकांना वेळ वाया जात होता. लोक असा वेळ वाया घालवण्याऐवजी रिक्षाने प्रवास करण्यास पसंती देत होते. व्हायरल व्हिडीओ ठाणे स्टेनशनचा असल्याचे समजते. ठाण्यात नेहमी असे दृश्य पाहायला मिळते.