आई होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी सुंदर भावना आहे. ही जाणीव झाल्यावर स्त्री स्वत:ला पूर्ण समजून घेऊ लागते. देवाने जगातील प्रत्येक स्त्रीला आई होण्याचे सुख दिले आहे. पण आजच्या काळातील बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे मानवी शरीरावर खूप परिणाम झाला आहे. याच कारणामुळे महिलांना गर्भधारणेसाठी पूर्वीपेक्षा जास्त अडचणी येत आहेत. पण, या अडचणींवरही उपाय शोधले जातात. त्यामुळे ज्या महिलांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होत नाही त्यांच्यासाठीही अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये आयव्हीएफ (IVF) ही सर्वाधिक लोकप्रिय पद्धत आहे.

आयव्हीएफ या पद्धतीत लॅबमध्ये भ्रूणावर प्रक्रिया करून, तो स्त्रीच्या गर्भाशयात टाकला जातो. सोशल मीडियावर एका डॉक्टराने लॅबमधील मायक्रोस्कोपमध्ये ठेवून या भ्रूणाचा प्रवास कसा सुरू होतो हे दाखवले आहे. आईच्या गर्भात प्रवेश करण्यापूर्वी कोषातील अंडी कशी दिसतात हे त्यांनी दाखवले आहे; जे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

व्हिडीओमध्ये त्यांनी एका मानवी जीवाचा एक अद्भुत प्रवास दाखवला आहे. त्यात त्यांनी भ्रूण सूक्ष्मदर्शक यंत्राच्या आत ठेवला आणि कॉम्प्युटरवर लोकांना त्याची झलक दाखवली. या भ्रूणावर आयव्हीएफ थिएटरमध्ये प्रक्रिया केली जाते. त्यानंतर तो आईच्या गर्भाशयात टाकला जातो. त्यानंतर अनेक प्रकारे सावधगिरी बाळगल्यानंतर नऊ महिन्यांत अंड्यापासून ते मानवी बाळ हा प्रवास पूर्ण होतो आणि त्यानंतर ते बाळ या जगात जन्म घेते.

View this post on Instagram

A post shared by Dr.Sunil Jindal (@drsunilkjindal)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @drsunilkjindal नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत आईच्या पोटात प्रवेश करण्यापूर्वीचा भ्रूणाचा प्रवास कसा आहे ते पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. त्यावर एका युजरने लिहिलेय की, यामुळेच डॉक्टरांना देव म्हटले जाते. जसा देव आईची झोळी भरतो, त्याचप्रमाणे हे डॉक्टरही हे काम करीत आहेत.