मुंबई लोकल आणि त्यामधला प्रवास नेहमीच सगळ्यांसाठी वेगळा असतो. मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं.

दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते. तर यात अनेक कपल्स एकत्र असूनही गर्दी असल्यामुळे वेगवेगळ्या डब्यातून प्रवास करतात. त्या प्रवासाचा वेळदेखील अनेकांना त्यांच्या जोडीदाराबरोबर घालवता येत नाही.

आपल्या जोडीदाराबरोबर थोडासा सहवास मिळावा हे सगळ्यांनाच वाटतं. पण ते नेहमी शक्य होत नाही. पण अशातच एका नवऱ्याने आपल्या बायकोसाठी मुंबई लोकलमध्ये जे केलं ते पाहून कौतुक करावं की त्याला शिक्षा करावी हे सांगण कठीण होईल.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक माणूस धोकादायकपणे ट्रेनमध्ये चढताना दिसतोय. पण ट्रेनमध्ये चढण्याआधी त्याने जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. रेल्वे स्थानकावरून ट्रेनमध्ये चढण्याऐवजी हा माणूस रेल्वे रुळांवर उतरला. त्याच्या समोरून भरवेगात ट्रेन आली. ती ट्रेन पकडण्याआधी त्याने त्याच्याकडे असणारी बॅग लेडिज कोचमध्ये असणाऱ्या त्याच्या बायकोला दिली आणि त्यानंतर तो जनरल डब्यात चढला.

ही घटना तिथल्याच एका प्रवाशाने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vaibhav_ki_mandali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ये प्यार को क्या नाम दू असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १७.९ मिलियन व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कृपया याची बढाई मारू नका. मुंबईतील एका सामान्य रहिवाशाला दररोज ज्या परिस्थितीतून जावे लागते ते अत्यंत धोकादायक आणि दुःखद आहे. सरकारने खरंच खूप निराश केले आहे” तर दुसऱ्याने “हे फक्त मुंबईकरच समजू शकतात” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत लिहिलं, “यालाच तर प्रेम म्हणतात”