Viral News : भारत विविधतेने नटलेला देश आहे. येथे प्रत्येक राज्यात वेगळी भाषा, वेगळी संस्कृती पाहायला मिळते. अनेक लोक नोकरी आणि शिक्षणासाठी वेगवेगळ्या राज्यात किंवा शहरात स्थलांतर करतात. अनेक जण नवीन ठिकाणी स्थलांतर केल्यानंतर नव्या शहरात रमतात तर काहींना त्यांच्या शहरांची आठवण येते. सध्या अशाच एका तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या तरुणीने मुंबई, बंगळूरूपेक्षा हैदराबाद चांगले आहे, असे सोशल मीडियावर सांगितले आहे

एका वर्षापासून हैदराबादला राहणाऱ्या या तरुणीने हैदराबाद हे मुंबई आणि बंगळूरूपेक्षा उत्तम असल्याचे सांगितले. तरुणीच्या या दाव्याने सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. या तरुणीने तिच्या पोस्टमध्ये हैदराबाद हे मुंबई आणि बंगळूरूपेक्षा का उत्तम आहे, याविषयी सविस्तर सांगितले आहे.

श्वेता कुक्रेजा असे या तरुणीने नाव असून Shweta Kukreja या तिच्या एक्स अकाऊंटवरून तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ही तरुणी लिहिते, “मी एका वर्षापासून हैदराबाद मध्ये राहते. मी केव्हापण मुंबई आणि बंगळूरूपेक्षा हैदराबाद निवडेल.” पुढे या तरुणीने यामागील कारणे सांगितले आहेत.
तिने लिहिलेय, “येथे खूप कमी ट्रॅफिक आहे.
विमानतळासाठी सर्वात उत्तम आउटर रिंग रोड (ORR) आहे
सगळीकडे हिरवेगार वातावरण आहे.
येथील सौंदर्य अप्रतिम आहे.
येथील जेवण अतिशय स्वादिष्ट आहे.
या शहराला आणखी पुढे नेण्याची गरज आहे.”

हेही वाचा : VIDEO : “मला भारतीय नवरा पाहिजे” विदेशी तरुणी शोधतेय लग्नासाठी मुलगा, व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल पोस्ट

हेही वाचा : फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक व्यक्तीला आपले शहर प्रिय असते याच पार्श्वभूमीवर या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी यावर सहमती दर्शवली आहे तर काही युजर्सनी याला विरोध केला आहे. एका युजरने लिहिलेय, “मी हैदराबाद मध्ये दोन वर्षांपासून राहतो, मलाही असाच अनुभव आला” तर एका युजरने लिहिलेय, “तेथील वातावरणाविषयी काय सांगाल?” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुरक्षेविषयी काय सांगाल?”