सुट्ट्यांमध्ये निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायला अनेकांना आवडते. काहीजण तर जंगल सफारीला प्राधान्य देतात. यादरम्यान अनेक जंगली प्राण्यांचे दर्शन झालेले, त्यांना जवळून पाहता आल्याचे फोटो, व्हिडीओ अनेकजण सोशल मीडियावर शेअर करतात. आपणही हा अनुभव घ्यायला हवा असे उत्साही करणारे हे व्हिडीओ असतात. पण काहीवेळा जंगल सफारी दरम्यान अनपेक्षित दुर्दैवी घटना घडतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काहीजण जंगल सफारी करत असताना त्यांच्यासमोर रानगवा आल्याचे दिसत आहेत. ते गाडी थोडावेळ न थांबवता दोन रानगव्यांच्या मधून गाडी नेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा या रानगव्यांना राग अनावर होतो आणि ते गाडीवर शिंगाने मारण्याचा प्रयत्न करतात. पाहा हा थरारक व्हिडीओ.

आणखी वाचा- Viral: ट्रेन दरीतून जातानाचा हा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ एकदा पाहाच

सुशांत नंदा यांनी शेअर केलेला व्हिडीओ:

आणखी वाचा: मॅच पाहताना चुकीची प्रतिक्रिया दिली अन्…; चिमुकल्याचा गोंडस Viral Video एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुशांत नंदा यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या अविचारी वागण्यावर संताप व्यक्त केला आहे. ‘जंगल हे गरज नसलेले साहस दाखवण्याचे ठिकाण नाही, ते प्राण्यांचे घर आहे. प्राण्यांच्या प्रायव्हसीचा विचार करा’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. नेटकऱ्यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आनंदासाठी वन्य प्राण्यांना त्रास देणे चुकीचे आहे, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.