बरेचदा आपण कुतूहल म्हणून दोन वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकत्र करून खातो. कधीतरी एखादा पदार्थ नकळत फारच सुंदर लागतो. तर कधी आपण हे असं काही खाण्याचा विचार तरी का केला असेल असा प्रश्न पडतो. सध्या सोशल मीडियावर असे बरेच व्हिडीओ आपल्याला दिसत असतात. त्यामध्ये आपल्याला कधी फळांचा चहा पाहायला मिळतो तर, कधी फॅन्टा मॅगी; तर कधी गुलाबजाम आईस्क्रीम डोसा असे पदार्थ पाहायला मिळतात. आता या वेळेस सिंगापूरमधील एका पाककला [culinary] व्लॉगरने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चक्क, संत्र्याच्या सरबतात चीज स्लाइस टाकून प्यायल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

वाचायला हा प्रकार जितका किळसवाणा वाटतो आहे, तितकाच तो चवीला देखील लागत आहे. कारण – सिंगापूरमधील कॅल्विन ली नावाच्या पाककला व्लॉगरने संत्र्याच्या चिजी सरबताची रेसिपी त्याच्या @foodmakescalhappy या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका रील व्हिडीओमधून शेअर केली असून; त्याला “संत्र्याचे चिजी सरबत, कुणाला हवे आहे का?” असे कॅप्शनदेखील दिले आहे.

या व्हिडीओमध्ये, कॅल्विन एका ग्लासमध्ये संत्र्याचे सरबत ओतून त्यामध्ये, चीज स्लाइस घालताना दिसत आहे. यानंतर त्याने चीज घातलेल्या सरबताचा ग्लास मायक्रोवेव्हमध्ये चीज वितळेपर्यंत ठेवला आहे. त्यानंतर ग्लास बाहेर काढून ग्लासातील चीज आणि सरबत व्यवस्थित ढवळून घेऊन त्याचा एक घोट घेतो. ते संत्र्याचे चिजी सरबत प्यायल्यानांतर कॅल्विनने “या सरबताची चव काहीशी आंबट, गोड आणि दुधाळ लागत आहे. पण हे सरबत पिण्यासाठी अतिशय भयंकर लागत असून, कृपया कोणीही हे सरबत कुतूहल म्हणून पिण्याचा प्रयत्न करू नका.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही पहा : Video : प्रेयसीला चक्क पोलिसांसमोर घातली लग्नाची मागणी!! तरुणाचे हे ‘फिल्मी’ प्रपोजल होत आहे Viral; व्हिडीओ पाहा

या व्हिडीओला चार लाख सत्तर हजार व्ह्यूज मिळाले असून, नेटकऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडीओवर एकाने, “अरे देवा हे काय आहे!! बघूनच पोटात कसेतरी होऊ लागले आहे.” असे म्हंटले. तर दुसऱ्याने, “मी हे पाहता क्षणीच ओळखले होते कि हे सरबत पाण्यासारखे अजिबात नाहीये.” तर तिसऱ्याने “आरोग्य मंत्रालय भीतीने या व्यक्तीपासून दूर राहतात.” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. तर शेवटी काही नेटकऱ्यांनी त्याला अजूनकाही विचित्र पदार्थ खाऊन बघण्यास सांगितले, “पुढच्या वेळेस, चीज स्लाइसऐवजी क्रीम चीजचा वापर करून पहा. कदाचित ते संत्र्याच्या चीजकेक सारखे लागेल.” “कोकमध्ये दूध मिसळून ते तीस मिनिटांसाठी बाजूला ठेवा आणि नंतर पिऊन पाहा.”