सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात शेअर केला जात आहे. हा धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ बॉईज हॉस्टेलचा आहे. या व्हिडीओमध्ये अनेक मुले एकत्र असे काही करताना दिसत आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण बॉईज हॉस्टेलबद्दल जो विचार सहसा केला जातो त्याच्या एकदम विरुद्ध तिथे होत आहे. बॉईज हॉस्टेलमध्ये जाऊन मुलं मस्ती, मज्जाचं करतात, बिघडतात असं समजणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडीओ पाहावा असं नेटीझन्स म्हणत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ प्रत्येक पालकांनी पाहावा ज्यांची मुले हॉस्टेलमध्ये राहतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही विचार करायला भाग पडेल. हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप वेगाने पाहिला जात असून नेटिझन्सना तो खूप आवडला आहे. वास्तविक, या व्हिडीओमध्ये बॉईज हॉस्टेलमध्ये अनेक मुले एकत्र हनुमान चालिसाचे पठण करताना दिसत आहेत.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक मुले रांगेत बसून हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. त्याच्या समोर टेबलावर लॅपटॉप ठेवलेला दिसतो. या लॅपटॉपमध्ये हनुमान चालीसा ऐकण्यात येत आहे. लॅपटॉपमध्ये हनुमान चालीसा ऐकून सर्व मुले हनुमान चालिसाचा जप करत आहेत.

(हे ही वाचा: अन् तो वाघाच्या मागे चालू लागला…; हा Viral Video एकदा बघाच!)

व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये एक मजेशीर गोष्ट लिहिली आहे, ‘नातेवाईक : मुले हॉस्टेलमध्ये खराब होतात, तुम्ही घरी शिकवा.’ ‘तर मुले हॉस्टेलमध्ये हे करतात.’ हा व्हिडीओ एवढा पसंत केला जात आहे की काही वेळातच याच्या व्ह्यूजचा आकडा १ मिलियनच्या पुढे गेला आहे. दरम्यान हॉस्टेलमध्ये राहणारी मुले त्यांच्या पालकांना हा व्हिडीओ पाठवत आहेत.

(हे ही वाचा: Desi Jugaad: या जुगाडू बाईकवर किती लोक बसले आहेत? तुम्ही मोजतचं राहाल)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ frustrated4thoughts नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून हजारोंच्या संख्येने लोक कमेंट करत आहेत. व्हिडीओ पाहून एका यूजरने ‘जय श्री राम’ अशी कमेंट केली. तर दुसरीकडे आणखी एका युजरने मजेशीर कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘त्या सर्वांची परीक्षा होणार आहे असे दिसते.’ सोशल मीडिया यूजर्स व्हिडीओवर मनापासून कमेंट करत आहेत आणि इमोजी कमेंट करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In boys hostel children recite hanuman chalisa in a unique way dhamal video viral ttg
First published on: 08-01-2022 at 10:39 IST