IND vs NZ: सामना सुरु असतानाच प्रेक्षकांकडून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा!; पहा व्हिडीओ

भारत आणि न्यूझीलंड सामना कानपूरमध्ये सुरू आहे. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

IND vs NZ Pakistan Murdabad
घटनेचा व्हिडीओ व्हायरल (फोटो: @pant_fc / Twitter )

India vs New Zealand 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये सुरू झाला आहे. ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मैदानावर अनोखे दृश्य पाहायला मिळाले. थेट सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ही घटना सहाव्या षटकात घडली. तेव्हा काही लोक पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत असल्याचे स्पष्टपणे ऐकू आले. काइल जेमिसनच्या षटकात शुभमन गिल फलंदाजी करत होता. यादरम्यान मुरली कार्तिक आणि त्याचे सहकारी समालोचक ऑफ-स्पिन चेंडूवर चर्चा करत होते. दरम्यान, काही लोकांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.

( हे ही वाचा: IND vs NZ: कसोटीत मालिकेत श्रेयस अय्यरचे पदार्पण, सुनील गावस्करकांडून मिळाली कॅप; खास क्षण कैमेऱ्यात कैद )

या घटनेशी संबंधित व्हिडीओमध्ये तुम्ही ३३ सेकंदावर जाऊन थेट ऐकू शकता. त्या वेळी काही लोक पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यर आज भारताकडून कसोटी पदार्पण करत आहे.

( हे ही वाचा: बाल्कनीत कपडे सुकवण्याच्या नादात वृद्ध महिला १९व्या मजल्यावरून पडली; थरारक दृश्य कैमेऱ्यात कैद )

पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राअखेर टीम इंडियाने एक गडी गमावून ८२ धावा केल्या आहेत. शुभमन गिल ५२ धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे तर चेतेश्वर पुजारा त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे. हे ज्ञात आहे की दोन्ही संघांमध्ये एकूण ६० कसोटी सामने झाले आहेत, त्यापैकी भारताने २१आणि न्यूझीलंडने १३ वेळा जिंकले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs nz pakistan murdabad announcement from spectators at the start of the match watch the video ttg