India Asia Cup 2025 Viral Video Fact Check : १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे लाईटहाऊस जर्नलिझमच्या लक्षात आले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याबरोबर भारतीय खासदार अनुराग ठाकूर आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी बसलेले दिसत आहेत. क्लिप शेअर करणाऱ्या युजर्सनी दावा केला आहे की, हा व्हिडीओ अलीकडच्या आशिया कप २०२५ मधील आहे.

तपासादरम्यान, आम्हाला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. व्हायरल झालेला व्हिडीओ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील जुना आहे आणि पहलगाम हल्ल्याच्या आधी काढलेला आहे.

काय होत आहे व्हायरल?

‘मिस्टर कूल’ नावाच्या एक्स युजरने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडीओ त्याच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.

इतर युजर्सही असाच दावा करून व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओमधील प्रमुख फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

त्यातून आम्हाला ११ मार्च रोजी पिंकविलाच्या फेसबुक पेजवर अपलोड झालेला तोच व्हिडीओ सापडला.

https://www.facebook.com/watch/?v=7934351676689687

त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते: “एक दुर्मीळ क्षण! जय शाह आणि शाहिद आफ्रिदी क्रिकेटच्या सामन्यादरम्यान एकत्र आणि चाहते त्यांच्याबद्दल बोलणे थांबवू शकत नाहीत”; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

२७ फेब्रुवारी रोजी जीएमटी न्यूज २ च्या फेसबुक पेजवरदेखील आम्हाला हा व्हिडीओ पोस्ट केलेला आढळला.

https://www.facebook.com/watch/?v=1152563253282586

२६ फेब्रुवारी रोजी क्रिकेट लव्हर्स फेसबुक पेजवरही हा व्हिडीओ पोस्ट केलेला आम्हाला सापडला.

https://www.facebook.com/watch/?v=1325300822048382

या पोस्ट्समुळे लाईटहाऊस जर्नलिझमने असा निष्कर्ष काढला की, हा व्हिडीओ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आहे, अलीकडच्या आशिया कप सामन्यातील नाही.

शिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. हा व्हिडीओ त्याआधी काढलेला आहे.

निष्कर्ष – आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याबरोबर भारतीय खासदार अनुराग ठाकूर आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी बसलेले दाखवणारा व्हिडीओ जुना आहे आणि भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यानंतर अलीकडचा म्हणून शेअर केला जातो आहे.