Indian Attack helicopter shot in Manipur viral video fact check: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे; ज्यामध्ये एक व्यक्ती हेलिकॉप्टरवर गोळीबार करताना दिसत आहे. हे भारतीय लढाऊ हेलिकॉप्टर असून, त्यावर मणिपूरमधील स्वातंत्र्यसैनिकांनी गोळीबार केल्याचा दावा केला जात आहे. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ दावा केल्याप्रमाणे मणिपूरचा नसून म्यानमारचा आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर माहिनने भ्रामक दावा करीत व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

या पोस्टचे अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहा.

https://archive.ph/fbrhM

इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.

https://twitter.com/UeximJPBVqd72hz/status/1832374387137253490

तपास :

आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

त्याद्वारे आम्हाला X वर दोन पोस्ट आढळल्या; ज्यात म्हटले आहे की, जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्यानमार वायुसेनेचे Mi-24 हेलिकॉप्टर काचिन इंडिपेंडन्स आर्मी (KIA)ने MANPADS वापरून पाडले आहे.

हेही वाचा… भारत की पाकिस्तान? शिक्षकाचे विद्यार्थ्यावर अत्याचार, छतावर उलट लटकवलं अन्…; VIRAL VIDEO नेमका आहे कुठला? पाहा

X या सोशल मीडियावर एका पत्रकाराने हा व्हिडीओ शेअर केला असून, तो म्यानमारचा आहे असा दावा केला आहे.

केआयएने जंटा हेलिकॉप्टरवर गोळी झाडली तेव्हा हा व्हिडीओ म्यानमारचा असल्याची माहिती देणारा व्हिडीओ अनेक X वापरकर्त्यांनी शेअर केला होता.

हेही वाचा… आंदोलक शिरले बांग्लादेशच्या पंतप्रधानांच्या घरात, स्विमिंग पूलमध्ये मारल्या उड्या अन्…; VIDEOतील गर्दीतून सत्य आलं समोर

पीआयबीनेही एका पोस्टमध्ये स्पष्ट केले होते की, हा व्हिडीओ मणिपूरचा नसून, म्यानमारचा आहे.

हेही वाचा… मरेन किंवा मारेन! वीजचोरी करून दिली अधिकाऱ्यालाच धमकी, VIRAL VIDEOचं पाकिस्तानशी आहे खास नातं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष : म्यानमारच्या हवाई दलाच्या Mi-24 अटॅक हेलिकॉप्टरवर गोळीबार केल्याचा म्यानमारमधील हा व्हिडीओ भारतातील मणिपूरमध्ये भारतीय हेलिकॉप्टरवर गोळीबार झाल्याचा व्हिडीओ म्हणून शेअर केला जात आहे. व्हायरल केले गेलेले दावे खोटे आहेत.