सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमुळे लोकं त्रस्त झाली आहेत. रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना देखील या थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने फुटपाथवर झोपणाऱ्या महिलेच्या अंगावर पाणी मारले. महिला थंडीमुळे महिला कापत आणि ओरडत होती तरीही हा निर्दयी माणूस थांबला नाही. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडिओ अमेरिकेतील असल्याचे समजण्यात येत आहे. याठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीत देखील गरीब लोकं रस्त्याच्या फुटपाथवर झोपत आहेत. अशा लोकांवर हा माणूस पाणी मारत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे हा निर्दयी माणूस रस्त्यावरील महिलेवर पाणी मारत आहे. महिला जोरजोरात ओरडत आहे तरीही हा माणूस थांबत नाहीये. आश्चर्यची गोष्ट म्हणजे हा माणूस चक्क हसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले..

( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील शेवटचा रस्ता, जिथे लोकांना एकट्याने जाण्यास परवानगी नाही)

ABC ने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला असून पाणी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव कोलियर आहे. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, तो सकाळी दुकानासमोर जागा धूत होता त्यावेळी त्यांनी झोपलेले लोकांना उठण्यास सांगितले होते. पण ते काही ऐकले नाहीत. त्यामुळे त्याने पाणी मारायला सुरुवात केली आणि त्यांना तेथून पळवलं. त्याचवेळी शेजारी असणाऱ्या दुकानदारांना त्याचा हा व्हिडिओ शूट केला आहे जो प्रचंड वायरल होतोय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inhumane video of us man spraying water water on homeless woman watch viral video gps
First published on: 14-01-2023 at 18:29 IST