Viral Video: आपण जे कर्म करतो, त्याचं फळ आपल्याला याच जन्मात मिळतं, असं अध्यात्मात सांगितलं जातं. “काम करा, फळाची इच्छा नको” अशी एक म्हण तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस कर्माचं फळ मिळतं, असं अनेकदा म्हटलं जातं. माणूस चांगली आणि वाईट दोन्ही कर्मं करतो आणि वाईट कर्मांचे परिणाम त्याला भोगावे लागतात. कधी कधी लोकांना त्यांच्या वाईट कर्माचं फळ लगेच मिळतं. आता कर्माबाबत असाच एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला त्याच्या कर्माचं फळ लगेच कसं मिळतं ते पाहूया…

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी काय व्हायरल होईल त्याचा काही नेम नाही. दररोज लोक सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करीत राहतात आणि त्यापैकी काही जे खूप वेगळे असतात किंवा लोकांना आवडतात, ते व्हायरल होतात. जर तुम्ही सोशल मीडियावर असाल आणि नियमितपणे सक्रिय असाल, तर तुम्ही विविध प्रकारच्या व्हायरल पोस्ट पाहिल्या असतील. कधी जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी स्टंट करणाऱ्या लोकांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. कधी एखादा मजेदार फोटो व्हायरल होतो, तर कधी दुसरेच काही व्हायरल होते. एक व्हिडीओ अजूनही व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा त्याच्या मित्रासह बंद दुकानाच्या शटरजवळ येत असल्याचे दिसून येते. त्यानंतर तो एक मुलगा दुसऱ्या मुलाला दोन्ही हात शटरवर ठेवायला सांगतो आणि नंतर थोडे खाली झुकायला सांगतो. त्यानंतर एक हात शटरवरून काढून, त्याच्या पायावर ठेवण्यास सांगतो आणि कमरेतून थोडं त्याला वाकायला लावतो. शटरवर असलेल्या त्याच्या एका हाताला झटक्याने मारतो आणि तो मुलगा खाली पडतो. हा मारणारा मुलगा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो; पण काही क्षणांतच त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. तो तिथून पळून जात असताना रस्त्यावरील येणाऱ्या ई-रिक्षाला धडकतो आणि खाली पडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

तुम्ही नुकताच पाहिलेला व्हिडीओ X प्लॅटफॉर्मवर @Dank_jetha नावाच्या अकाउंटद्वारे पोस्ट केला गेला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते, “मी कामावर जातो आणि काही घटना घडते.” बातमी लिहेपर्यंत एक लाख ४२ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करीत लिहिले, “भाऊ, खरोखरच एक घोटाळा घडला आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “एके दिवशी तुम्ही गुन्हे केल्यानंतर नरकात पोहोचाल.” तिसऱ्याने लिहिले, ” इन्स्टंट कर्मा.”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.