Happy International Yoga Day 2025 Wishes Quotes Messages Status : दरवर्षी २१ जून ‘योग दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व आणि त्याचे फायदे जगभरात पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावावरून संयुक्त राष्ट्रांनी २०१४ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून, हा दिवस जगभरात साजरा केला जात आहे.
भारतात ५,००० वर्षांपूर्वी शरीर, मन आणि आत्म्याच्या कल्याणासाठी योग ही पद्धत विकसित करण्यात आली आहे. नियमित योगा केल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते. योगामुळे आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव होते. शरीर व मन दोन्ही निरोगी राहते. त्यासाठी नियमित योगाभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, २१ जून रोजी साजरा केला जाईल. आयुष मंत्रालयाने २०२५ चा आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम जारी केली आहे. २१ जून हा दिवस “एक पृथ्वी, एक आरोग्य” या थीमसह साजरा केला जाणार आहे. या योग दिनी तुम्ही आप्तस्वकीयांना तसेच मित्र मैत्रीणींना योग दिनाच्या शुभेच्छा पाठवून योगा करण्यास करण्यास प्रोत्साहित करू शकता. जाणून घेऊ या काही निवडक व सुंदर शुभेच्छा संदेश.
स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे
योगाचा नियमित सराव करा,
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा!
योग आहे आरोग्यासाठी क्रांती
तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती
सकाळ अथवा संध्याकाळ, रोज करा योग
कधीही येणार नाही जवळ कोणताही रोग
योग निसर्गाजवळ नेतो आणि योग देतो ईश्वराची अनुभूती.
तुम्हा सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा!
मन ठेवायचे असेल शांत, तर योगा नियमित करणे आहे अनिवार्य!
योग दिनाच्या शुभेच्छा!
जगाला आनंदी आणि सुदृढ करूया, चला सर्व योगाकडे वळूया
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
शरीर निरोगी असेल, तर मनही निरोगी राहते
सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा!
चांगले आरोग्य आंतरिक शक्ती, शांत मन आणि आत्मविश्वास आणते.
योग दिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते, आरोग्याला जपा अन् नियमित योग करा.
योग दिनाच्या शुभेच्छा!