scorecardresearch

Premium

CSK च्या चाहत्यांच्या गर्दीचा ‘तो’ फोटो खोटा? IPL फायनलच्या सामन्यादरम्यानचा Viral फोटो नेमका कुठला जाणून घ्या

Chennai Super Kings Fans Photo: सोशल मीडियावर अहमदाबाद येथील चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांच्या गर्दीचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Fact Check CSK fans viral photo
आयपीएलच्या सामन्यादरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अंकिता देशकर

Chennai Super Kings Fans Photo: आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने जेतेपदावर नाव कोरंल आहे. IPL च्या इतिहासात चारवेळा जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामातही आयपीएलचा किताब काल जिंकला आहे. खरं तर काल झालेला अंतिम सामना हा रविवारी होणार होता, परंतु पावसामुळे तो राखीव दिवशी म्हणजेच काल सोमवारी २९ मे रोजी खेळवण्यात आला. आयपीएलच्या सामन्यादरम्यानचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रविवारी असाच एक फोटो व्हायरल होत होता, ज्यामध्ये आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये CSK चे चाहते मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचा दावा करण्यात येत होता.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अहमदाबाद येथील चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स च्या टी-२० सामन्याच्या आधीचा असल्याचं सांगण्यात येत होतं. या व्हायरल फोटोंचे लाईटहाऊस जर्नालिज्मने फॅक्ट चेक केले असता ते खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे समोर आले आहे. शिवाय ते फोटो चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्सचे नाहीत आणि ते अहमदाबादचे देखील नाहीत.

ते फोटो नेमके कुठले आहेत?

ट्विटर यूजर Ajeet Kumar ने काही व्हायरल फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहले आहे की, अहमदाबादमधील चेन्नई सुपर किंग्ज (MSD) चे समर्थक….हे चेपॉक नाही, हे अहमदाबाद गुजरात आहे (महेंद्रसिंग धोनी) असं लिहित खाली त्याने विविध हॅशटॅग देखील दिले आहेत.

हा संग्रहित फोटो पाहा –

https://web.archive.org/web/20230530070454/https://twitter.com/ajeetkr03/status/1662894711273832448

यूजर्सनी शेअर केलेले फोटो –

असाक एक फोटो ज्यामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमामात गर्दी दिसत आहे. तो देखील मोठ्याप्रमाणात शेअर करण्यात आला होता.

तपास –

सर्वात आधी पहिला फोटोसाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरून तपास सुरू केला. हा तपास केल्यानंतर व्हायरल फोटो ‘ग्रेट इथिओपियन रन’चे असल्याचं समजलं.

तसेच आम्हाला ते व्हायरल फोटो काही न्यूज रिपोर्ट्समध्येही सापडले.

जर्मन रोड रेसेसमध्ये एक आर्टिकल आम्हाला सापडले ज्याचे हेडिंग होते –

Gashaw and Gebreselama crowned champions at 2020 Total Great Ethiopian Run. It also attributed the picture to the organisers.

आम्हाला एका लेखात ग्रेट इथिओपियन रनमधील इतर प्रतिमांसह हे फोटो देखील सापडले.

आम्हाला हा फोटो सीएनएनच्या एका आर्टिकल मध्ये देखील सापडला.

आम्हाला २०१७ मध्ये ट्विटर प्रोफाइलवर शेअर केलेला एक फोटो देखील आढळला. कॅप्शनमध्ये म्हटले होते, द ग्रेट इथिओपियन रन – २९१७

त्यामुळे CSK आणि GT फायनलच्या आधी क्लिक केलेला व्हायरल फोटो अहमदाबादचा नाही याची पुष्टी झाली.

आम्ही दुसऱ्या फोटोवर देखील गूगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर केला.

आम्हाला EFE Deportes च्या ट्विटर हँडलवर दुसरा व्हायरल फोटो सापडला. ट्विटमध्ये म्हटले आहे: #EFEfotos | ग्रॅन कॅनरिया स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहत्यांनी यूडी लास पालमासचे स्वागत केले. #LaLigaSmartBank

आम्हाला २३ जून २०१५ चा एक Facebook व्हिडिओ देखील सापडला, जो व्हायरल फोटोमध्ये दिसणाऱ्या ठिकानासारखा दिसत होता. कॅप्शनमध्ये म्हटले आहे: यूडी लास पालमासचे चाहते स्टेडियमच्या बाहेर डे ग्रॅन कॅनरिया विरुद्ध झारागोझा २१.६.२०१५ संघाचे स्वागत करतात.

निष्कर्ष –

CSK आणि GT फायनलपूर्वी अहमदाबादमधील असल्याचा दावा करण्यात आलेला व्हायरल फोटो हा २०१७ मधील ग्रेट इथिओपियन रनचा आहे आणि दुसरा फोचो स्पेनमधील ग्रॅन कॅनरिया स्टेडियमच्या बाहेर UD लास पालमासचे स्वागत करणाऱ्या चाहत्यांचा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 18:25 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×