IPL 2024 Auction : आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत पार पडला, या लिलावात अनेक खेळाडूंवर इतके पैसे खर्च करण्यात आलेत की, ज्याची कल्पनादेखील अनेकांनी केली नव्हती. लिलावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांना २०२३ मध्ये टूर्नामेंट जिंकलेल्या संपूर्ण संघापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत. सर्वात विक्रमी बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. या दोघांवर अनुक्रमे २४.७५ कोटी आणि २०.५० कोटी रुपयांच्या विक्रमी बोली लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली आहे. स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ कोटी रुपये देऊन खरेदी केले आहे. खेळाडूंवर लागलेल्या बोलीवरुन आता सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. अनेक नेटकरी या लिलावावरुन मजेदार मीम्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. जे पाहून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होऊ शकतं. तसेच झोमॅटोसारख्या कंपनीनेदेखील मीम बनवल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- ऑफिसमध्ये झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्याने बॉसलाच गंडवलं, व्हायरल VIDEO पाहताच नेटकऱ्यांनी केला सलाम

खरं तर, आयपीएल २०२४ च्या लिलावातही अनेक खेळाडू कोट्यवधी रुपयांना विकत घेतले जात आहेत, ज्याची अपेक्षा देखील लोकांनी केली नव्हती. यामुळेच ते सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

मीम्समध्ये सध्याच्या सिनेमातील अनेक ट्रेंडिंग आणि फेमस गाणी वापरण्यात आली आहेत.

न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेलला चेन्नई सुपर किंग्जने लिलावात १४ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वेस्ट इंडिजचा गोलंदाज अल्झारी जोसेफला ११ कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतले आहे. या क्रमात, भारताच्या हर्षल पटेलला पंजाब किंग्जने त्याला ११,७५ कोटीत विकत घेतले आहे.

आजवरचे सर्वांत महागडे क्रिकेटपटू कोणते?

स्टार्क आणि कमिन्सपाठोपाठ महागड्या क्रिकेटपटूंच्या लिस्टमध्ये इंग्लंडचा सॅम करन (१८.५० कोटी, पंजाब किंग्ज-२०२३), ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन (१७.५० कोटी, मुंबई इंडियन्स-२०२३), इंग्लंडचा बेन स्टोक्स (१६.२५ कोटी, चेन्नई सुपरकिंग्ज-२०२३), दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी, राजस्थान रॉयल्स-२०२१), भारताचा युवराज सिंग (१६ कोटी, डेली डेअरडेव्हिल्स-२०१५), वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन (१६ कोटी, लखनऊ सुपरजायंट्स – २०२३), पॅट कमिन्स (१५.५० कोटी, कोलकाता नाइटरायडर्स-२०२०), भारताचा ईशान किशन (१५.२५ कोटी, मुंबई इंडियन्स-२०२२) आणि काइल जेमिसन (१५ कोटी-रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु-२०२१) यांचा समावेश होतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 crores spent on players in ipl auction the deluge of memes on social media will not make you smile jap
First published on: 20-12-2023 at 16:42 IST