Murderer Express Indian Railway’s Translation Gaffe Changes Train’s Name : विविध भाषांमधील शब्द किंवा वाक्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी अनेक जण गूगल ट्रान्स्लेट या सॉफ्टवेअरची मदत घेतात. पण, अनेकदा त्यावरील भाषांतर योग्य रीतीने केले गेलेले नसल्यामुळे शब्दांचा अर्थ बदलतो आणि गडबड होते. त्यामुळे गूगलद्वारे केल्या गेलेल्या भाषांतरावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका, असे अनेकदा सांगितले जाते. तरीही काही लोक गूगल ट्रान्स्लेशनवर विश्वास ठेवतात. अशाच प्रकारे भारतीय रेल्वेने गूगल ट्रान्स्लेशनची मदत घेतली आणि त्यानंतर व्यवस्थापनाला प्रवाशांच्या मोठ्या रोषाला सामोर जावे लागले. याच घटनेचा एक फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रेल्वेने गूगल ट्रान्स्लेशनचा वापर करून एका एक्स्प्रेस गाडीचे नाव बदलले. मात्र गूगल ट्रान्स्लेशनमध्ये त्या स्थानकाच्या नावाचा भलताच अर्थ आला; जो अधिकाऱ्यांनाही समजला नाही. तरीही ट्रान्स्लेट करून आलेले एक्स्प्रेसचे नाव जसेच्या तसे वापरण्यात आले; जे पाहून युजर्स चांगलेच संतापले. स्थानकाच्या नावाचा बदललेल्या अर्थ मर्डर ट्रेन, असा झाला आणि तेच नाव संपूर्ण गाडीवर झळकताना दिसले. हे नाव वाचून प्रवासी खूप भडकले. यावेळी रेल्वेने चूक मान्य करीत तत्काळ चुकीचे दिसणारे नाव झाकून टाकले.

PHOTO : “मुलाला वाचविण्यासाठी बहिणीने घेतली चालत्या ट्रेनमधून उडी अन्…”; रेल्वे प्रवासातील भीषण स्थितीवर युजर्सचा संताप

भारतीय रेल्वेने मल्याळम भाषेतील एका स्थानकाचे नाव बदलले. हे नाव बदलताना भाषांतरात मोठी चूक झाली. गूगल ट्रान्स्लेशनमध्ये हटिया रेल्वेस्थानकाचे नाव मल्याळम भाषेत भाषांतर करताना हत्या स्थानक, असे झाले. आणि त्याच ट्रान्सलेट झालेल्या नावाचा फलक ट्रेनवर लावण्यात आला; ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे नाव वाचून युजर्स संतापले आहेत. प्रवाशांनी सोशल मीडियावर याबाबत निषेध व्यक्त केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि तत्काळ त्यांनी आपली चूक मान्य केली.

हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेसवर ‘हटिया’ असे लिहिलेल्या नावाचा एक फलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फलक व्हायरल झाल्याने भारतीय रेल्वेवर अनेकांची टीका केली. रेल्वेने गूगल ट्रान्स्लेशनच्या मदतीने हटियाचे मल्याळममध्ये ‘कोलापथकम’ असे भाषांतर केले. ज्याचा हिंदीतील अर्थ- खून करणारी व्यक्ती, असा होतो. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करीत मल्याळम शब्द पिवळ्या रंगाने झाकून टाकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हटिया हे रांचीमधील ठिकाण आहे. हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेस साप्ताहिक गाडी असून, ती हटिया आणि एर्नाकुलम या दोन्ही शहरांना जोडते.