इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. यात असाच एक काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात हमासचे सशस्त्र घेऊन असलेले दहशतवादी कथितरित्या एका इस्त्रायली कुटुंबाला ओलीस ठेवताना दिसत आहेत. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हमास दहशवाद्यांनी या कुटुंबातील एका मुलीची तिच्या आई- वडिलांसमोरच निर्दयीपणे हत्या केली. अशाप्रकारे इस्त्रायलमध्ये हमास मोठ्या प्रमाणावर नरसंहार करत असल्याचे अमेरिकेतील इस्त्रायली दूतावासाने म्हटले आहे. या दहशतवाद्यांनी १०० हून अधिक इस्त्रायलींना ओलीस ठेवत अतिशय अमानुष वागणूक दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतूनही हमासकडून सुरु असलेली नरसंहाराची क्रूरता उघड झाली आहे. हा व्हिडीओ इस्त्रायलमधील पत्रकार इंडिया नफ्लाली यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यात एक जोडपे अतिशय भेदरलेल्या मनस्थितीत मुला- मुलीसह जमिनीवर बसले आहेत. ही दोन्ही मुलं अल्पवयीन असल्याचे दिसतेय. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओमध्ये, एक जोडपं अतिशय घाबरलेल्या, बिथरलेल्या मनस्थितीत आपल्या मुला- मुलीला घेऊन जमिनीवर बसले आहेत. यावेळी चौघही आपल्यातील एक व्यक्ती मेली म्हणून दुख: करायचे की आपला जीव वाचवायचा या विचाराने खूप बिथरल्यासारखे वागत आहेत. यावेळी मुलगा वडिलांना, बाबा तुमच्या हाताला रक्त का लागले आहे? असा प्रश्न विचारात खूप रडू लागतो. तर केविलवाण्या अवस्थेत बसलेली मुलगीही रडत, माझी बहिण जिवंत राहावी अशी माझी इच्छ होती पण त्यांनी माझ्यासमोर तिची हत्या केली, म्हणत हमसून रडतेय. यावेळी पालकही जीव मुठीत धरुन मुलांचे सांत्वन करताना दिसत आहेत. यावेळी पालकांनी दोघांनाही जमिनीवर झोपण्यास सांगितले कारण हमासचे दहशतवादी अगदी त्यांच्या घराबाहेरच बेछूट गोळीबार करत होते.

तेवढ्यात एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येतो, पण कॅमेराचा अॅगल कमरेच्या खाली असल्याने त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही मात्र त्याच्या खांद्यावर एक बंदूक होती, जी कॅमेरात अर्धी दिसतेय.

नफताली यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, हमासच्या दहशतवाद्यांनी एका इस्त्रायली कुटुंबाला ओलीस ठेवले होते. यावेळी कॅमेरासमोर त्यांची क्रूरता उघड झाली, एका मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, ज्यामुळे तिच्या भावंडांना धक्का बसला. ही क्रूरता आहे. जगाने हे जाणून घेण्याची आणि थांबवण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हमास गटाने केलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पहिल्या तासात अपहरण आणि ओलीस ठेवण्याच्या घटना घडल्या. यावेळी सीमेवरील कुंपण पाडण्यासाठी या दहशतवाद्यांनी फायटर पॅराग्लायडर आणि बुलडोझरचा वापर करत इस्त्रायलमध्ये घुसखोरी केली. सोशल मीडियावर या युद्धादरम्यान झालेल्या क्रूरतेचे, निर्दयीपणाचे आणि नरसंहाराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.