Viral Video: माकडापासून उत्क्रांती होऊन माणून तयार झाला. त्यामुळे माकडांना अनेकदा माणसांचे पूर्वज समजले जाते. माकडांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात; ज्यात ते माणसांप्रमाणेच भांडण करताना दिसतात अथवा काहीतरी काम करताना दिसतात. मागे व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका माकडीणीने तिच्या आगाऊ मुलाला बेदम चोप दिला होता. दरम्यान, आता असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एका माकडानं चक्क हनुमानाच्या मंदिरात जाऊन असं काहीतरी केलं, जे पाहून तुम्हीदेखील अवाक व्हाल.

पुरातन काळापासून माकडांना भगवान हनुमानांची वानर सेना, असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक रामकथा किंवा हनुमान कथांमध्ये माकड उपस्थित राहतात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यावर नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण सुरू असते त्यावेळी अचानक तिथे एक माकड येते आणि गाभाऱ्यात जाऊन बसते. माकडाला पाहून तेथील एक पुजारी त्याला एक फळ खायला देतात; पण फळ पाहून माकड त्याला नाही म्हणते. त्यावेळी ते दुसऱ्या पुजाऱ्याच्या हातातील फुलांचा हार स्वतःच्या हातामध्ये घेऊन, त्या पुजाऱ्याच्या हातावर बसते. पुजारी माकडाला हनुमानाच्या मूर्तीजवळ नेतात त्यावेळी ते माकड स्वतःच स्वतःच्या गळ्यात हार घालून घेते. माकडाने हार घातलेला पाहून मंदिरातील लोक मोठमोठ्याने जय श्रीराम, जय श्रीराम म्हणतात. त्यानंतर माकड मंदिरातून बाहेर निघून जाते.

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @divyanshi__255 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास १५ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि १० लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर नेटकरी अनेक कमेंट्स करीत आहेत. एकाने लिहिलेय, “जय श्रीराम.” आणखी एकाने लिहिलेय, “हनुमान स्वरूप अवतरले.”

हेही वाचा: आमचा मुलगा MPSC करतोय… पत्रिकेत ठळक अक्षरात लिहिलं मुलाचं शिक्षण;Photo पाहून हसून व्हाल लोटपोट

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा अनेक प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते; जे देवाच्या मंदिरात जाऊन पूजा करताना दिसले होते. एका व्हिडीओमध्ये कुत्रा देवाला साष्टांग दंडवत घालताना दिसला होता; तर आणखी एका व्हिडीओत एक मांजर देवाला प्रदक्षिणा घालताना दिसत होते.