Jaipur incident: महिलांविरुद्ध होणाऱ्या छेडछाड आणि मारहाणीच्या घटना थांबत नाहीत, अशातच अशीच एक घटना आज पुन्हा एकदा घडली आहे. दुपारी रस्त्यावरून चालत असताना एका युवकाने एका मुलीला अनपेक्षितपणे कानाखाली मारली. मात्र, त्याला त्याच्या चुकीचा तात्काळ प्रतिसाद मिळाला; मुलीने आपली चप्पल काढून त्याच्या चेहऱ्यावर मारून त्याला धक्का दिला आणि त्यानंतर युवकाला तिथून पळुन गेला. या घटनेचा व्हिडीओ एका नागरिकाने रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जयपूरच्या चाकसू भागातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.व्हिडीओमध्ये दिसते की, एक तरुण बाईकवर बसलेल्या तीन मुलींबरोबर वाद घालत आहे. सुरुवातीपासूनच त्यांच्यात भांडण सुरू होते, पण काही क्षणांतच युवक बाईकवरून उतरतो आणि पिंक टॉप घातलेल्या मुलीला कानाखाली मारतो. यावर ती मुलगी आपली चप्पल काढून युवकाला जोरदार मारते. त्या घटनेत इतर दोन मुलीही सहभागी होतात आणि तरुणाला चांगलाच धडा शिकवतात. काही क्षणांनंतर युवक घाबरून बाईक घेऊन पळून जातो
पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केल्यानंतर लोकांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. अनेकांनी मुलीच्या धाडसाचे कौतुक केले आणि सांगितले की, महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी कधी कधी तात्काळ प्रतिसाद देणे आवश्यक असते. काहींनी युवकाच्या वर्तनाची निंदा केली आणि अशा प्रकारच्या छेडछाड-मारहाणीच्या घटनांवर कडक कारवाईची मागणी केली, तर काहींनी असा प्रतिसाद देण्याची गरज नसल्याचेही मत व्यक्त केले.
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी युवकाला अटक केली आहे. अशा प्रकारच्या घटना समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज दाखवतात, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आणि हिंसाचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक असल्याचे दिसून येते. व्हिडीओ आणि त्याची प्रतिक्रिया लोकांनी महिलांच्या सुरक्षिततेविषयी सतर्क राहणे आवश्यक आहे, याची जाणीव करून दिली आहे.