एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाने देशात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाच होता, आता हा चित्रपट जपानमध्ये देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. २१ ऑक्टोबरला जपानमध्ये आरआरआर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तेथील दर्शकांना भुरळ घातली आहे. चित्रपटाविषयी जपानमधील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे एका व्हिडिओतून दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये एक जपनी यूट्यूबर आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावर भन्नाट नृत्य करत असल्याचे दिसून येत आहे. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला प्रचंड पसंती मिळत आहे.

मायो या यूट्यूबरने हा डान्स व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये ती एका तरुणासोबत नाटू नाटू या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. या गाण्यातील स्टेप्स अवघड आहे. मात्र, फार सहजपणे ती आणि तिचा मित्र या गाण्यावर नाचताना दिसत आहे. नृत्य करताना त्यांच्यातील समन्वय आणि त्यांच्या दमदार स्पेट्स प्रभावित करून सोडतात. व्हिडिओ पाहून तुमची देखील नृत्य करण्याची इच्छा होईल. मायोने अफलातून नृत्य केले आहे.

(Viral video : श्वानाच्या पिल्लाने सशाची केली भन्नाट नक्कल, मग सशाने पाहा काय केले..)

पोस्टमध्ये तिने व्हिडिओसह कॅप्शनही दिले आहे. यामध्ये राम चरण, राजामौली आणि ज्युनियर एनटीआर यांची मुलाखत घेतल्यानंतर आम्ही इतके उत्साहित झालो की घरी येताना आम्ही हा व्हिडिओ बनवला, अशी माहिती मायोने कॅप्शनमधून दिली आहे. गाण्याचे स्टेप्स कठीण आहेत. मात्र मायो आणि तिच्या मित्रांनी सुंदररित्या या गाण्यावर नृत्य केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायोने शेअर केलेल्या व्हिडिओला ५५ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरी मायो आणि तिच्या मित्रांचे कौतुक करत आहेत. एका युजरने फार छान नृत्य केल्याचे म्हटले आहे, तर ज्यांना डान्स करायला आवडे ते नक्कीच या गाण्यावर डान्स करून पाहतील. हीच भारतीय चित्रपटांची शक्ती असल्याचे एका युजरने म्हटले आहे.