रॉकी अँड रानी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतो आहे. त्यातली आलिया आणि रणबीरची केमिस्ट्री सगळ्यांनाच भावली आहे. याच सिनेमातलं What Jhumka ? हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहे. याच गाण्याच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी एक खास ट्वीट केलं आहे. या ट्वीटची चांगलीच चर्चा होते आहे. मुंबई पोलीस कायमच आपल्या ट्विटर हँडलवर विविध ट्विट्स करुन जनजागृती करत असतात तसंच हे ट्वीट आहे.

काय आहे मुंबई पोलिसांचं ट्वीट?

Anyone looking For Missing Jhumka? असा प्रश्न मुंबई पोलिसांनी आपल्या ट्वीटमध्ये विचारला आहे. तसंच तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू जर गमावल्या तर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा #Dial100 असंही म्हटलं आहे.

अनेकदा लोक बाहेर पडल्यानंतर, प्रवास करत असताना त्यांच्या वस्तू हरवतात, चोरीला जातात किंवा इतर काही प्रसंग घडतात. अशा वेळी पोलिसांशी संपर्क साधला गेला पाहिजे आणि तक्रार नोंदवली पाहिजे असंच या मेसेजमधून मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी खास झुमका या शब्दाचा वापर केला आहे. झुमका हे गाणं सोशल मीडियावर हिट ठरलं आहे. युट्यूब या गाण्याला चार कोटींहून जास्त व्ह्यूज आहेत. रणबीर आणि आलिया या दोघांनीही या गाण्यात डान्स केला आहे. या गाण्यात जुन्या झुमका गिरा रे बरेली के बाजारमें या गाण्याचाही वापर करण्यात आला आहे. या गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी जनजागृती करण्यासाठी झुमका या शब्दाचा वापर करत वस्तू हरवली तर पोलीस तक्रार करायला मागे पुढे पाहू नका असं म्हटलं आहे.