लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये एक महिला लोकल ट्रेनमधील बंद पडलेला फॅन सुरू करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. फॅन सुरू करण्यासाठी महिलेने जो जुगाड केला आहे, तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ लोकलमधील महिलांच्या एका डब्यातील आहे. या व्हिडीओमध्ये तु्म्हाला दिसेल की लोकलच्या या डब्ब्यात महिलांची गर्दी दिसत आहे आणि या डब्ब्यातील फॅन बंद आहे. तेव्हा एक महिला फॅन सुरू करण्यासाठी पुढे येते. बंद पडलेला फॅन कसा सुरू करावा, यासाठी ती एक अनोखा जुगाड करते.
पेन्सिलच्या मदतीने ती फॅन फिरवण्याचा प्रयत्न करते आणि फॅन सुरू होतो.फॅन सुरू झाल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. ही महिला आनंदाने उड्या मारायला लागते आणि आजुबाजूच्या महिलासुद्धा फॅन सुरू झाल्यानंतर आनंदी झालेल्या दिसतात. महिलेच्या या स्वस्त जुगाडाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : “कधीही फोन करा, फोन लागेल व्यस्त…” उखाण्यातून नवरीने मांडली व्यथा, नवरदेव पाहतच राहिला…

localtrain_girl या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “पेन्सिल फिरवा आणि फॅन सुरू करा. जादूची काडी ” या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुंबई लोकलच्या गोष्टी” तर एका युजरने लिहिलेय, “मुलगी इंजिनिअर बनली. मुलगी शिकली प्रगती झाली.”