Jyoti Maurya- Alok Kumar Case: SDM ऑफिसर ज्योती मौर्य यांनी आजपर्यंत पती आलोक कुमार यांच्याविरुद्ध अनेक आरोप लगावले आहेत. हुंडा, मानसिक छळ अशा आरोपानंतर आता आपल्याला त्रास देण्यासाठी आलोक प्रायव्हेट फोटो सुद्धा जगासमोर दाखवेल अशी भीती ज्योती यांनी वाटत आहे. इतकंच नाही तर आलोककडे सरकारी कामाशी संबंधित अनेक गोपनीय दस्तऐवज आहेत. जर वेळीच त्याच्याविरुद्ध कारवाई केली नाही तर तो या गोष्टी सुद्धा स्वतःच नाटक सिद्ध करण्यासाठी व्हायरल करू शकतो असे ज्योती यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत ज्योती मौर्य यांनी अनेक मुद्द्यांवर मौन सोडून भाष्य केले आहे. ज्योती सांगतात की, “आलोकने तो एक ग्राम पंचायत अधिकारी आहे असे सांगून माझ्याशी लग्न केले, माझ्या घरच्यांनाही अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत हे माहीत नव्हतं. मी फॅमिली कोर्टात घटस्फोटाची तक्रार दाखल केल्यावर आता तो स्वतःला वारंवार सफाई कर्मचारी म्हणून इमोशनल कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या घटस्फोटाच्या याचिकेवर १८ ऑगस्टला सुनावणी पार पडणार आहे. तर या प्रकरणात माझ्या विभागाकडून सुद्धा तपास सुरु आहे. मला उच्च अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारलेच तर मी त्याचे उत्तर देईन, राहिला प्रश्न Whats App चॅट्सचा तर मागील १० महिन्यापासून आलोकने माझे Whats App अकाउंटच हॅक करून ठेवले आहे. मी त्याच्या विरुद्ध आयटी ऍक्ट अंतर्गत तक्रारही केली आहे. तो व त्याचं कुटुंब सतत माझ्याकडे पैसे मागत आहे.”

हे ही वाचा<< “प्रेमाने सोड नाहीतर..”, ज्योती मौर्य यांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; आलोकला म्हणाल्या, “तुझं प्रेम मिळालं नाही म्हणून..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वी आलोक कुमार यांनी ज्योती मौर्य व त्यांचा कथित प्रियकर मनीष दुबे यांचे चॅट्स मीडियाला दाखवले होते. यामध्ये दोघे आपल्याला संपवण्याचा (जीवे मारण्याचा) कट रचत असल्याचा आरोपही आलोक यांनी केला होता. यानंतर आलोक व ज्योती यांच्यातील कॉलचे रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झाले होते. या प्रकरणात आता १८ ऑगस्टला कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.