Amazon वरून ऑर्डर केला आयफोन १२, जेव्हा पॅकेट उघडले तेव्हा त्यातून निघाले ५ रुपयांचे नाणे आणि साबण!

व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये हिरव्या रंगाचा विम डिश वॉश साबण आणि ५ रुपयांचे नाणे दिसत आहे.

lifestyle
७०,९०० रुपये किंमतीच्या आयफोनऐवजी निघाले विम बार साबण आणि ५ रुपयाचे नाणे. (फोटो: प्रतिनिधिक)

केरळमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने ई-कॉमर्स वेबसाइटवरून आयफोन (Apple iPhone 12) मागवला होता. पण, डिलिव्हरी झाल्यानंतर त्या व्यक्तीने पॅकेट उघडले तेव्हा त्याला फार मोठा धक्का बसला. कारण, भांडी धुण्यासाठी एक साबण आणि पाच रुपयांचे (5 रुपयांचे नाणे) त्या पॅकेटमधून बाहेर आले. या व्यक्तीची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाणून घेऊया नेमकी काय झाले.

वास्तविक, केरळच्या अलुवा येथील रहिवासी नूरुल अमीन एनआरआय (NIR)आहेत. त्यांनी अलीकडेच अॅपलचा आयफोन १२ मोबाईल ऑनलाइन ऑर्डर केला. नुरुल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अॅमेझॉनवरून आयफोन मागवला होता, ज्याची किंमत ७०,९०० रुपये आहे.

पाकिटातून साबण आणि नाणे बाहेर आले

आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा पार्सल नुरूल यांच्याकडे आले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, पण जेव्हा त्यांनी पार्सल उघडले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कारण ७०,९०० रुपये किंमतीच्या आयफोनऐवजी पॅकेटमध्ये विम बार साबण आणि ५ रुपयांचे नाणे बाहेर आले.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये हिरव्या रंगाचा विम डिश वॉश साबण आणि ५ रुपयांचे नाणे दिसत आहे. नूरुल यांनी पोलिसांत तक्रार केली, त्यानंतर त्यांचे सर्व पैसे गहाळ झाले. तक्रारीनुसार, नूरुल यांनी १२ ऑक्टोबर रोजी त्याच्या Amazon Pay कार्डद्वारे आयफोन ऑर्डर केला होता.

चूक कुठे झाली?

या संदर्भात गुन्हा दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आणि नुरुल यांना जो फोन येणार होता. तो सप्टेंबरपासून झारखंडमधील कोणीतरी वापरत असल्याचे आढळून आले. आयएमईआय नंबर पाहिल्यानंतर ही गोष्ट समोर आली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की- “आम्ही अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांशी आणि तेलंगणास्थित विक्रेत्याशी संपर्क साधला. हा फोन झारखंडमध्ये या वर्षी २५ सप्टेंबरपासून वापरला जात आहे, जरी ऑर्डर ऑक्टोबरमध्येच देण्यात आली होती. जेव्हा त्यांनी विक्रेत्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितले की फोन स्टॉकमध्ये नाही आणि नूरूल यांनी दिलेली रक्कम परत केली जाईल. ” असे सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kerala man orders iphone 12 receives vim bar and rs 5 coin instead scsm

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या