–अंकिता देशकर
Viral Photo Last Neanderthal Giant Man: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक पोस्ट शेअर होत असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर दिसली. हा फोटो शेअर करून दावा करण्यात येत होता कि हा जगातील शेवटच्या निएंडरथल महाकाय माणसाचा फोटो आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Victor Mochere ने व्हायरल इमेज शेअर करत लिहिले की: The last Neanderthal giant.
बाकी यूजर्स देखील याच दाव्यासह हे चित्र शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही आमचा तपास निएंडरथल बद्दल अधिक तपास करत सुरु केला. आम्हाला आढळले की निएंडरथल्स हे विलुप्त प्रजातींपैकी मानवी शरीराच्या ठेवणीशी मिळते जुळते वैशिष्ट्य असणारे महाकाय सजीव आहेत.
४०,००० वर्षांहून अधिक काळ या प्रजाती नामशेष होत असल्याचे आम्हाला आढळून आले. महाकाय निएंडरथल पाहण्यासाठी यासंदर्भात कोणते फोटो डॉक्युमेंट करण्यात आले आहेत का हे आम्ही गेटी इमेजवर तपासले. परंतु आम्हाला गेटी इमेजेसवर कोणताही फोटो सापडला नाही.
त्यानंतर आम्ही यांडेक्स वर हे चित्र तपासले. आम्हाला हे चित्र एका वेबसाईट वर मिळाले जिथे मिडजर्नीमार्फत हा एआय निर्मित फोटो पोस्ट केलेला आढळून आला.
आता हे स्पष्ट झाले होते कि एआई जनरेटर ‘मिडजर्नी’ चा वापर करून हे चित्र बनवण्यात आले असावे.आम्ही या चित्राचा बॅकग्राउंड आणि त्यात दिसत असलेले लोकं यांचे फोटो देखील तपासले. आम्हाला त्यांचे चेहरे ब्लर असल्याचे आढळले. असे सहसा ए आई निर्मित चित्रांमध्ये होते. आम्हाला हे चित्र reddit वर देखील पोस्ट केलेले असल्याचे कळले. हे एका कम्युनिटी मध्ये पोस्ट केले होते ज्याचे नाव ‘midjourney’ असे होते.
आम्हाला मिडजर्नी नावाच्या एका टेलिग्राम चॅनेल वर देखील हा फोटो पोस्ट केलेले असल्याचे समजले. हा फोटो २६ एप्रिल रोजी पोस्ट केला होता. त्यानंतर आम्ही आतापर्यंतचा सर्वात उंच माणूस कोण होता हे देखील शोधून काढले, आम्हाला कळले कि त्यांचे नाव रॉबर्ट वाडलोव असे आहे.
हे ही वाचा<< हिंदूंना आव्हान करत Viral होतोय मुस्लिम लहाग्याचा भररस्त्यातील ‘तो’ Video; प्रचंड टीका होताना ‘ही’ खरी बाजू करते थक्क
निष्कर्ष: निअँडरथल प्रजातीचा महाकाय मानव असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल पोस्ट बनावट आहेत आणि AI चा वापरून तयार केल्या आहेत.