Leopard’s visit police station Viral Video : बिबट्या…हा जंगलात राहणारा जंगली प्राणी आहे पण आज काल अनेक जंगल नष्ट होत चालल्याने आता हे बिबट्यासारखे जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसत आहे. ग्रामीण भागात अनेकदा बिबट्यांचा धुमाकूळ घालणारा व्हिडिओ नेहमी चर्चेत येत असतात पण आता गावातच नव्हे तर शहरांमध्येही बिबट्या वावरताना दिसत आहे. नुकताच पुण्यातील विमानतळावर बिबट्या आढळल्याचा व्हिडिओ चर्चेत आला होता. या घटनेला २४ तास होण्यापूर्वीच तामिळनाडूतील एका पोलिसस्टेशनमध्ये बिबट्याने प्रवेश केल्याचा व्हिडिओ सोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, एक बिबट्या पोलिसस्टेशनच्या कॉरिडॉरमधून आत्मविश्वासाने फिरताना आणि वेगवेगळ्या खोल्यांमध्ये डोकावताना दिसतो.

तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील नादुवट्टम पोलिस स्टेशनमध्ये एका अनपेक्षित पाहुण्याने दिवसाढवळ्या भेट दिली. एका बिबट्याच्या अनपेक्षित आगमनाने पोलिसस्टेशनमध्ये उडाली खळबळ उडाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या संपूर्ण घटनेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे आणि त्यांनाही आश्चर्य वाटले आहे.

आता व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, बिबट्या पोलिस स्टेशनमध्ये दबक्या पावलाने शिरतो. तो अगदी आत्मविश्वासाने सर्वत्र फिरताना दिसत आहे. तो सर्व खोल्यांमध्ये जाऊन डोकावतो. दरम्यान ड्युटीवर असलेले पोलिसकर्मचारी अचानक आलेल्या बिबट्याला पाहून घाबरलेले दिसत होते, तरीही संपूर्ण चकमकीदरम्यान शांतता होती. व्हिडिओमध्ये घाबरून दरवाजाच्या मागून एक पोलिस कर्मचारी बाहेर डोकावताना दिसत आहे. बिबट् खोलीतून निघून गेल्यावर त्याने त्वरीत दरवाजा बंद केला आणि दरवाजाची कडी लावण्याचा प्रयत्न केला. बिबट्या निघून गेल्याचे लक्षात येताच त्याला सुरक्षित असल्याची जाणीव झाली.

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी एक्स वर शेअर केला होता, ज्यांनी पोलिस पथकाच्या शांत प्रतिसादाचे कौतुक केले. “एका बिबट्याने निलगिरीमधील नादुवट्टम पोलिस स्टेशनची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला सलाम ज्यांनी शांतपणे दरवाजा बंद केला आणि वन अधिकाऱ्यांना बोलावले. कोणालाही दुखापत झाली नाही. बिबट्या जंगलात सुरक्षितपणे परत गेला,” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले.

नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आणि पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक केले. काहींनी विनोद केला की,”बिबट्या तक्रार दाखल करण्यासाठी आला आहे, तर काहींनी अधिकाऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले.

बिबट्या अखेर इमारतीतून बाहेर पडला, परंतु या घटनेमुळे वन्यजीव मानवी वस्तीत वाढत्या प्रमाणात भटकंती करत असल्याबद्दल चिंता पुन्हा निर्माण झाली आहे. सुदैवाने, वन अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की,”बिबट्या सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक वातावरणात परतला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओला आधीच १२७,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि तो प्लॅटफॉर्मवर पसरत आहे, जो शहरी जीवन आणि वन्यजीव यांच्यातील पातळ रेषेची एक आकर्षक आठवण करून देतो.