viral video: तुम्ही सर्वांनी जंगलाचा राजा सिंहाविषयी ऐकलं असेल की, जेव्हा तो शिकार करतो तेव्हा तो समोरच्या प्राण्याचा जीव घेतल्याशिवाय थांबतच नाही. आजकाल सिंहांचे अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाता आपल्याला पाहायला मिळतात. काही लोकांनी तर असे धोकादायक प्राणी पाळायलाही सुरुवात केली आहे. मात्र सिंह कधीही कोणावरही हल्ला करू शकतो. त्यांना तुम्ही पाळलं आणि कितीही जीव लावला तरी ते भडकल्यावर कोणावरही हल्ला करू शकतात. सध्या सोशल मीडियावर हेच दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाच धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.

“आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?”

जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. कधी कुठून आपल्यावर कसा हल्ला होईल याचा मागमूसही नसतो. त्यामुळे प्रत्येक पावलावर सावध राहील नाही तर जीवानीशी जाण्यावाचून प्राण्यांकडे पर्याय नसतो. तसेच माणसाचंही असते. जंगलात गेल्यावर सर्वाधिक धोका हा मानवाला असतो.

‘हा’ VIDEO बघून झोप उडेल

सध्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती जंगल सफारीसाठी आला आहे. यावेळी तो जंगलात भटकंती करण्यासाठी त्याच्या गाडीतून उतरुन जंगलात फिरत आहे. सगळीकडे चारही बाजूला झाडं, जंगल आणि शांतता असताना या व्यक्तीला अचानक समोरुन कुणीतरी येताना दिसत. हाच घोका ओळखून तो तिथून तसाच मागे सुसाट धावत सुटतो आणि गाडीच्या दिशेने पळत सिटतो. यावेळी त्याच्या दिशेने त्याच्याच प्रचंड वेगात कुणीतरी येत असतं. दरम्यान तुम्ही पाहू शकता, हा व्यक्ती सुसाट पळत जातो आणि आपली गाडी लॉक करतो तेवढ्यात सिंह येतो आणि जोरदार झडप गाडीवर घालतो. अवघ्या एका सेंकदाच्या फरकाने हा व्यक्ती गाडीत बसला नाहीतर तो आता सिंहांच्या जबड्यात असता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: एक वेळ…एक ठिकाण…१० सेकंदात बाईकवरुन चाकाखाली; थरारक लाईव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियामध्ये दररोज नवनवीन व्हिडिओ शेअर होत असतात. काही रंजक असतात तर काही थरारक. सध्या रंजक व्हिडिओसोबतच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.