Little Boy Dance Viral Video: रोज सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. काही मजेशीर असतात, काही विचार करायला लावणारे, तर काही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे. पण लहान मुलांचे व्हिडीओ हे नेहमीच खास असतात. त्यांचा निरागसता, उत्साह व बिनधास्तपणा यांत अशी एक मजा असते की, ती कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकाला थक्क करून सोडते. सध्या अशाच चिमुकल्यांचा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो केवळ त्याच्या डान्स स्टेप्ससाठी नव्हे, तर त्यांच्या आत्मविश्वासासाठीही लोकांच्या पसंतीस उतरत आहे. डान्समधील त्या छोट्याच्या अदा पाहून अनेक जण म्हणतायत, “मोठ्यांना लाजवेल असा परफॉर्मन्स दिलंय!” नेमकं काय आहे या चिमुकल्यांच्या डान्समागचं वेगळेपण? आणि का व्हिडीओ होत आहे सगळीकडे चर्चेचा विषय? व्हिडीओ पाहाल, तर तुम्हीही होऊन जाल त्यांच्या तालावर फिदा…

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक लहानसा मुलगा ‘टिंकू जिया’ या आयटम सॉन्गवर असा काही भन्नाट डान्स करतोय की, पाहणाऱ्यांचे डोळेच थक्क झालेत. या चिमुकल्याने गडद तांबडा रंगाचा कुर्ता घातला असून, त्याच्या एनर्जीफुल स्टेप्स आणि कंबर मटकावण्याची अदा पाहून मोठमोठे डान्सर्सही फिके वाटू लागलेत.

या व्हिडीओत एकाच वेळी तीन मुलं डान्स करताना दिसतात, पण संपूर्ण लक्ष वेधून घेतो तो म्हणजे गडद तांबडा कुर्ता घातलेला छोटा मुलगा. त्याचा आत्मविश्वास, चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स आणि थेट कमर मटकवणं… हे सगळं इतकं जबरदस्त आहे की, ते पाहून तुम्हीही खळखळून हसाल आणि डोकं हलवायला सुरुवात कराल.

सामान्यपणे लग्नसराई, बर्थडे पार्टी किंवा कुटुंबाच्या फंक्शनमध्ये डीजे वाजायला लागला की, लहान मुलं बिनधास्त नाचायला लागतात. त्यांना ना कोणाचं भान असतं, ना संकोच; पण काही मुलं अशी असतात की, त्यांच्या डान्समुळे सगळ्या मंडळींचं लक्ष त्यांच्याकडेच जातं. असाच प्रकार या चिमुकल्याच्या बाबतीत घडलाय.

या व्हिडीओमध्ये केवळ डान्सच नाही, तर त्या मुलाचा कॉन्फिडन्स, स्टेज प्रेझेन्स व हास्य हे सगळंच लोकांच्या मनाला भिडतंय. व्हिडीओवर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, “हा तर छोटा गोविंदा वाटतोय”, तर काहींनी “हे पाहून मूड फ्रेश झाला”, अशा कमेंट्स केल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ Instagram आणि Facebook वर जोरदार व्हायरल झाला असून, हजारो लोकांनी त्याला लाइक, शेअर व कमेंट्स दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक गोष्ट मात्र नक्की, या चिमुकल्याच्या डान्सनं फक्त मजाच दिली नाही, तर जगाला हेही दाखवून दिलं की, आपलं वय लहान असलं तरी त्यात टॅलेंटची कमी नाही.