अस म्हणतात ना, मुलगी ही खूप नशिबान लोकांच्या घरात जन्माला येते. ज्यांनी आयुष्यात काही चांगली कामं केली आहेत त्यांना नशिबात मुलीचा बाप होण्याचं भाग्य मिळते. पण आजही काही आई-वडील मुलींना आयुष्यातील एक ओझ मानतात. घरात मुलगी जन्माला आली तर तो शाप मानला जातो. पण जगात असेही लोक आहेत जे एका मुलीचा बाप होणे म्हणजे स्वत:ला भाग्यवान समजतात. मुलीची ओढ तिच्या वडिलांकडे जास्त असते. वडिलांना काही दुखलं-खुपलं तर मुलीला खूप काळजी वाटते. त्यामुळे मुली वडिलांच्या सेवेसाठी नेहमीच तयार असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच बाप-लेकीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचं मनही आनंदाने भरुन येईल, कदाचित तुमच्या डोळ्यातून पाणीही येईल.

व्हिडीओमध्ये एक अपघातग्रस्त वडिल दिसतायत, ज्यात त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने नीट चालता येत नव्हते. पायाला प्लॅस्टर असल्याने त्यांना स्टिक्सच्या साहाय्याने चालावे लागत होते. वडिलांचे हे दुखणं चिमुरडी पाहू शकली नाही आणि तिने लगेच त्यांना बसण्यासाठी खुर्ची ओढायला सुरुवात केली, जेणेकरून ते खुर्चीवर आरामात बसू शकतील. चिमुरडीने वडिलांसाठी आपल्या छोट्या हातांनी जीवापेक्षा मोठी खुर्ची सरकवली. त्यानंतर चिमुकलीने वडिलांच्या हातातून स्टीक घेत त्या दुसऱ्या ठिकाणी ठेवली. यातून वडिलांचा त्रास छोटी चिमुरडी देखील पाहू शकली नाही असे दिसतेय. हा व्हिडिओ त्याचे जिवंत उदाहरण आहे. जर तुम्ही देखील एका मुलीचे वडील असाल तर तुम्हाला ही गोष्ट चांगली समजू शकेल. व्हिडीओतील हे दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे.

पहा चिमुरडीचा सुंदर व्हिडिओ

चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ ट्विटरवर @TheFigen_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लिटिल काइंड हार्ट! मुलीचा बाप असल्याचा अभिमान आहे. अवघ्या २८ सेकंदांचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर २ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.

सोबतचचिमुरडीने वडिलांची केलेली सेवा पाहून युजर्सनीही विविध कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘मुली देवदूत असतात आणि माझ्याकडे 2 आहेत’, तर दुसऱ्या यूजरने ‘म्हणूनच मला मुलगी हवी’ असे लिहिले आहे.