Little girl catches snake viral video: सापाचा विषय जरी निघाला तरी अनेकांना धडकी भरते. घनदाट जंगलात, खेडेगावात साप दिसला तर त्याचं आश्चर्य आपल्याला वाटणार नाही. पण तुम्ही असेच घरी बसलाय आणि अचानक तुमच्या बाजूला साप दिसला तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सापाला पाहून तुम्हाला घाम तर फुटेलच पण त्या ठिकाणाहून तुम्ही लगेच पळ काढाल.

काही साप विषारी असतात तर काही बिनविषारी. सर्पमित्रांना याबद्दल जास्त माहिती असते. पण अनेकांना त्याची काहीच माहिती नसल्याने साप पाहताच थरकाप उडतो. यादरम्यान, सोशल मीडियावरदेखील अशाप्रकारचे सापाचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे अनेकांनी पाहिलेच असतील. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जिथे एका घरात साप शिरलाय आणि एका चिमुकलीने चक्क त्याला पकडून आपल्या अंगणात आणलं आहे.

हेही वाचा… पठ्ठ्याची हिंमत तर बघा! मिरवणूकीत चक्क पोलिसांसमोर केला डान्स अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “एक तरी नमुना…”

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की एका घरात अचानक साप शिरला आहे. एका टेबलाच्या मागे तो साप लपला असताना चिमुकली त्या सापाला धरून बाहेर काढण्याचा आणि खेचण्याचा प्रयत्न करतेय. सापाला बाहेर काढता काढता ती तिच्या आईलादेखील खूप हाका मारताना दिसत आहे.

“अम्मी घर में साप घुस गया, अम्मी जल्दी आओ…” असं म्हणत ती त्या सापाला टेबलाखालून काढते आणि घराच्या बाहेर नेते. तरीही तिची अम्मी काही येत नाही.

हा व्हिडीओ @rahmanbhai786r या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तब्बल १०.४ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तर तीन लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

हेही वाचा… पूल आहे की मृत्यूचा सापळा! ठिकठिकाणी पडलेत भले मोठे भगदाड, वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास; Viral फोटोमागचं नेमकं सत्य काय?

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं “या लेकीची अम्मी नक्कीच सापाला पाहून कुठेतरी बेशुद्ध पडली असणार.” तर दुसऱ्याने “साप पण घाबरला” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आजकालची मुलं काय खतरनाक आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सापाचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीत एका क्लासरूमच्या एसी व्हेंटमधून साप वर्गात शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.