देशात लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यात अनेक राजकीय नेते आणि त्यांच्याशी संबंधित दिशाभूल करणारे जुने व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री व सत्ताधारी भाजपचे गुजरातच्या पोरबंदर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मनसुख मांडविया यांच्यावर बूट फेकल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती भरसभेत केंद्रीय मंत्र्यावर बूट फेकून मारताना दिसतेय. काही युजर्स हा व्हिडीओ सध्याचा असल्याचे समजून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल करीत आहेत.

त्यावर भाजपच्या पोरबंदर जिल्हा युनिटने हा २०१७ मध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडीओ आहे. भाजपा व मांडविया यांची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय फायदा घेण्यासाठी हा व्हिडीओ मुद्दाम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल करण्यात येत आहे, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, लाइटहाऊस जर्नलिझमला केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर बूट फेकून मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळून आले. पण, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, असा सवाल आता नेटकरी उपस्थित करीत आहेत.

काय होत आहे व्हायरल?

Atul Londhe Patil या एक्स युजरने व्हायरल व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेअर केला.

या पोस्टचे अर्काइव्ह व्हर्जन पाहा.

https://web.archive.org/web/20240409061441/https://twitter.com/atullondhe/status/1776599855764283579

इतर युजर्सदेखील तोच व्हिडीओ शेअर करीत तो अलीकडील असल्याचा दावा करीत आहेत.

तपास :

आम्ही गूगल कीवर्ड सर्च वापरून आमचा तपास सुरू केला. यावेळी आम्हाला या घटनेशी संबंधित एक बातमी सापडली.

https://timesofindia.indiatimes.com/topic/shoe-hurled-at-mandaviya-in-vallabhipur

यावेळी आम्हाला ‘टाइम्स नाऊ’ने अपलोड केलेल्या घटनेचा व्हिडीओदेखील सापडला. बातमी आणि व्हिडीओ २९ मे २०१७ रोजी अपलोड करण्यात आला होता.

https://timesofindia.indiatimes.com/videos/news/gujarat-shoe-hurled-at-union-minister/videoshow/58893526.cms

बातमीत नमूद केले आहे :

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील वल्लभीपुरा येथे एका कार्यक्रमादरम्यान पाटीदार आंदोलन कार्यकर्त्याने रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी, रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यावर बूट फेकून मारला.

आम्हाला या घटनेबाबत अनेक बातम्याही सापडल्या.

https://www.hindustantimes.com/india-news/shoe-hurled-at-union-minister-mansukh-mandaviya-in-gujarat/story-HPRwznPEYFX4Rms9WLxmAI.html

आम्हाला अलीकडील एक बातमीदेखील सापडली; ज्याचे शीर्षक आहे : गुजरातमधील भाजपचे मंत्री मांडविया यांच्यावर बूट फेकल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी

https://economictimes.indiatimes.com/news/elections/lok-sabha/india/gujarat-bjp-seeks-action-over-circulation-of-old-video-of-shoe-hurled-at-minister-mandaviya/articleshow/109135945.cms?from=mdr

निष्कर्ष :

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर बूट फेकून मारल्याचा जुना व्हिडीओ २०१७ मधील असल्याचे सिद्ध झाले आहे. हा व्हिडीओ अनेक जण अलीकडील असल्याचा दावा करून व्हायरल करीत आहेत. पण, व्हायरल व्हिडीओतील हा दावा दिशाभूल करणारा आहे.