Viral wedding card: पुढच्या महिन्यात देशभरात लोकसभा निवडणुकांना सुरुवात होईल. तसेच पुढच्या महिन्यापासून लग्नसमारंभाचे बारही मोठ्या प्रमाणात उडतील. याच पार्श्वभूमीवर एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हैदराबादमधली संगारेड्डी जिल्ह्यातील एका वडिलांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी पाहुण्यांना आमंत्रित करताना एक खास विनंती केली आहे. त्यांनी लग्नात भेटवस्तू देऊ नयेत असे सांगितले आहे. पण थांबा. त्याबदल्यात त्यांनी एक अनोखी भेट मागितली आहे. एका भाजप समर्थकाने चक्क लग्न पत्रिकेवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे लग्नाची निमंत्रण पत्रिका. लग्नाच्या दोन महिन्यापूर्वी निमंत्रण पत्रिका छापली जाते. बरेच वेळा वधु-वर आपल्या लग्नपत्रिका हटके पद्धतीच्या छापताना दिसतात. तर बरेचदा पत्रिकेवर “आहेर स्विकारला जाणार नाही तुमची उपस्थिती हाच आमचा आहेर” अशा पद्धतीचा मजकुर लिहलेला पाहयला मिळतो. मात्र या भाजप समर्थकानं थेट मोदींना मतदान करा हाच आमच्यासाठी आहेर असल्याचं म्हंटलं आहे. नानिकांती नरसिम्हालू असे या भाजप समर्थकाचे नाव असून त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेवर पत्रिकेत “नवविवाहित जोडप्यासाठी भेटवस्तू आणू नका, तर आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मतदान करा,” असा संदेश दिला आहे.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Wardha Lok Sabha, pm modi,
“आता बस झाले, यापुढे सभा मिळणार नाही,” कोणी दिला इशारा? जाणून घ्या सविस्तर…
A unique wedding invitation card from Pune encouraged citizens to exercise their voting rights
लग्नपत्रिका नव्हे! या हटके पत्रिकेतून केली लोकांना मतदान करण्याची विनंती, एकदा क्लिक करून नीट पाहाच
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”

हा विवाह ४ एप्रिल रोजी हा विवाह सोहळा आहे. त्याआधी त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लग्नाला येताना महागडा आहेर नको, फक्त पंतप्रधान मोदींना मतदान करा, जर तुम्ही नरेंद्र मोदीजींना मत दिले तर ही लग्नाची भेटवस्तू ठरेल, असे यामध्ये म्हटले आहे.

पाहा लग्नपत्रिका

हेही वाचा >> आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त…नातवासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली रंगपंचमी; नेटकरी म्हणाले…

“माझ्या कुटुंबाला ही कल्पना चांगली वाटली आणि त्यांनी मला परवानगीही दिला,” टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात नरसिमुअस यांनी सांगितले. सध्या याच लग्नपत्रिकेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.