Bangladeshi Immigrants Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये दाखवलेल्या व्हिडीओसह असा दावा केला जात होता की, त्रिपुरातील आदिवासी लोकांनी बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांवर बाणांनी हल्ला केला आहे. पण, खरंच अशी कोणती घटना घडली का? याविषयी सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं ते काय आहे जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर्स Mr Roy ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला.
इतर युजर्सदेखील समान दाव्यांसह तोच व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.
आम्हाला ९ डिसेंबर २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडीओ आढळला.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे : शनिवार, ७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता दोन वेगवेगळ्या उमेदवारांच्या (उमेदवार ज्यांना ‘पास्लोन’ असे म्हणतात.) समर्थकांमध्ये इंटान जया जिल्ह्यात संघर्ष झाला, जवळपास चार तास दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला, यात चार दुकानं जळून खाक झाली. या संघर्षात १००० हून अधिक लोक सहभागी होते, ज्यांच्याकडे स्वतःची युद्धाची हत्यारे, दगड आणि धारदार हत्यार होती. यावर पोलिसप्रमुख, कोम्पोल सुबेक्ती विबोवो म्हणाले की, “पास्लोन ३” (अपोलोस बागाऊ) यांच्या समर्थकांना जेव्हा संशय आली की, “पास्लोन १” (अनेर मैसेनी) त्यांची मत हिरावून घेतले, त्यावेळी या संघर्षाला सुरुवात झाली.
आम्हाला दुसऱ्या इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडीओ सापडला.
आम्हाला घटनेबद्दलच्या काही बातम्यादेखील सापडल्या.
अशाच एका बातमीत म्हटले आहे की : इंटान जयाचे पोलिसप्रमुख, आयुक्त सुबेक्ती विबोवो यांनी सांगितले की, या संघर्षात १,००० हून अधिक लोक सहभागी होते आणि प्रत्येक जण स्वतःची युद्धाची हत्यारे, दगड आणि इतर धारदार हत्यारे घेऊन सज्ज होते.
व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम दृश्य असलेले आणखी एक वृत्त आम्हाला आढळले.
निष्कर्ष : सेंट्रल पापुआमध्ये दोन उमेदवार जोडीच्या समर्थकांमधील संघर्षाचा जुना व्हिडीओ आता भारतातील त्रिपुरामधील व्हिडीओ असल्याचे सांगून व्हायरल होत आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.